…तर दात मोत्यासारखे चमकतील !जाणून घ्या, प्लाक आणि टार्टर साफ करणे म्हणजे काय ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दात पिवळसर होणे, वेदना होणे, हिरड्यांना सूज येणे, जंत यासारख्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. धूम्रपान , काळजी न घेता खराब आहार घेणे हे देखील यामागचे कारण आहे. याचे एक कारण म्हणजे

प्लाक आणि टार्टरमध्ये बॅक्टेरिया आणि घाण जमा होणे आहे. दात आणि हिरड्यांच्या या समस्यांमुळे मधुमेह आणि कोरोनरी रोग वाढू शकतो, त्यामुळे दात व्यवस्थित साफ करणे खूप महत्वाचे आहे.

प्लाक आणि टार्टर म्हणजे काय?

प्लाक हा जीवाणूंचा एक चिकट थर आहे. हिरड्यांच्या खाली व वरती विकसित होणाऱ्या जीवाणूंच्या
थराला टार्टर म्हणतात. यामुळे हिरड्याना रोग होण्याची भीती असते

दातांपासून टार्टर आणि प्लाक काढून टाकण्याचे नैसर्गिक मार्ग…

१) कोरफड आणि ग्लिसरीन

१ चमचा एलोवेरा जेल, ३ चमचे ग्लिसरीन, १/२ कप बेकिंग सोडा आणि काही थेंब लिंबू घालून दातावर स्क्रब करा. १० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. रोज हे केल्याने दात पिवळसर होणार नाहीत आणि दाताची समस्या देखील दूर होईल.

२) संत्र्याची साल

संत्र्याची साल दातावर घासल्यास प्लाक आणि टार्टरची समस्या मुळापासून नष्ट होते. दररोज असे केल्याने दात पिवळसर होणार नाहीत आणि ते मोत्यासारखे चमकतील.

३) व्हिटॅमिन सी फूड्स

टोमॅटो, स्ट्रॉबेरी सारखे व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ टार्टर आणि प्लाकवर लावून १० मिनिटांनंतर मालिश करून स्वच्छ धुवा. हे जीवाणू काढून टाकेल जाईल आणि दातातील पिवळसरपणा दूर होईल.

४) तिळाच्या बिया

मूठभर तीळ बिया चावा पण त्यांना गिळू नका. यानंतर जुन्या टूथब्रशने दात स्वच्छ करा. दररोज असे केल्याने आपल्याला स्वतःहून फरक जाणवेल.

५) व्हिनेगरने गुळण्या करा

२ चमचे व्हिनेगरमध्ये पाण्यात टाकून गुळण्या करा. दररोज २-३ वेळा असे केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहतील. तसेच दातातील पिवळसरपणा देखील दूर होईल.

You might also like