Dry Lips : हिवाळा सुरू होताच ओठ फाटू लागतात ?, ‘हे’ 4 घरगुती उपचार देतील आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळ्याच्या हंगामात, लोकांना बहुधा ओठ फाटण्याच्या समस्येचा त्रास होण्यास सुरुवात होते. डॉक्टर म्हणतात की, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा असे होते. वास्तविक, हिवाळा सुरू होताच आपण पाण्याचा वापर कमी करतो, ज्यामुळे कोरडी त्वचा आणि ओठांचा त्रास होतो. या हिवाळ्यात आपले ओठ सुंदर आणि मऊ बनविण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि खाली दिलेल्या सल्ल्यांचे अनुसरण करा.

ओठांनादेखील ओलावा आवश्यक आहे

आपल्या त्वचेप्रमाणेच, आपल्या ओठांनाही ओलावा आवश्यक आहे, म्हणून भरपूर पाणी प्या फळे आणि भाज्या खा. बाहेर जाताना एसपीएफ असलेली लिप ग्लोस लावा.

ग्लिसरीन-मॅट लिपस्टिक

ग्लिसरीन अधिक कोरड्या त्वचेसाठी आणि ओठांसाठी होम औषध म्हणूनदेखील योग्य आहे. हे ओठांवर आणि डोळ्यांभोवती लावा. जर कोरडे ओठ असतील तर मॅट लिपस्टिक लावण्याऐवजी क्रीमयुक्त लिपस्टिक लावा.

शिया बटर किंवा नारळ तेल

दिवसादेखील ओठांवर शिया बटर लावा. त्यात एसपीएफचे गुणधर्मदेखील आहेत. हे ओठांना पोषण प्रदान करते. हिवाळ्यात नारळ तेल नियमितपणे लावा. आतून ओठांना पोषण देण्यासाठी नाभीवर नारळ तेलदेखील वापरले जाऊ शकते.

अँटी-ऑक्सिडंटदेखील आवश्यक आहे

मेकअप एक्सपर्ट आकृती कोचर यांच्या म्हणण्यानुसार, व्हिटॅमिन-ई समृद्ध लिप बाम एंटी-ऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे आणि ते ओठ मऊ आणि गुलाबी ठेवतात. हिवाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांचे कारण मृत त्वचादेखील आहे. म्हणून, ओठांना स्क्रब करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण मध आणि साखरसह स्क्रब बनवू शकता. मध ओठांचा मऊपणादेखील कायम ठेवतो.

You might also like