Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies For Seasonal Allergies | कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. या दिवसात दिवसा तापमान वाढत आहे तर सकाळ-संध्याकाळ थोडी थंडी असते. अशा या ऋतूतील बदलामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत आहे. अनेक प्रकारचे आजार विशेषतः अ‍ॅलर्जीचे आजार (Allergic Diseases) यावेळी डोक वर काढतात. हंगामी अ‍ॅलर्जीला गवत ताप किंवा हंगामी अ‍ॅलर्जीक नासिकाशोथ असेही म्हणतात. अ‍ॅलर्जीची ही लक्षणे एखाद्या वेळी वाढतात, त्यामुळे ताप (Fever), सर्दी (Cold) आणि थंडी वाजून येणे (Chills), असे अनेक प्रकार होतात. या काळात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी आहे,त्यांना हंगामी अ‍ॅलर्जीचा धोका (Seasonal Allergies Risk) जास्त असतो (Home Remedies For Seasonal Allergies).

 

अशावेळी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. आपण अनेक घरगुती उपचारांचा वापर या काळात करू शकतो. ऋतूबदलासोबत होणार्‍या अ‍ॅलर्जीमध्ये खूप फायदेशीर ठरलेल्या घरगुती उपायांविषयी आपण जाणून घेऊया (Home Remedies For Seasonal Allergies).

 

– मधाचे औषधी फायदे (Benefits Of Honey)
अ‍ॅलर्जीच्या समस्या दूर करण्यासाठी मध (Honey) हे खूप फायदेशीर मानले जाते. घसा खवखवणे किंवा अ‍ॅलर्जीमुळे होणारी वेदना दूर करण्यापासून ते अ‍ॅलर्जीची इतर लक्षणे कमी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मधाचे सेवन (Consumption Of Honey) फायदेशीर ठरते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात दोन चमचे मध आणि लिंबाचा रस (Lemon Juice) सेवन करावे.

 

– कच्च्या लसणाचे फायदे (Benefits of Raw Garlic)
लसूणात (Garlic) असलेल्या प्रतिजैविक गुणधर्मामुळे (Antibiotic Properties) त्याचा वापर पोटाच्या समस्या दूर करण्यापासून ते हंगामी अ‍ॅलर्जी टाळण्यापर्यंत सर्व प्रकारात होऊ शकतो. दररोज रिकाम्या पोटी दोन ते चार कळ्यांचे सेवन केल्यास पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित ठेवण्याबरोबरच घशाच्या समस्या (Throat Problems) कमी होण्यास मदत होते.

– हळदीच्या दुधाचे फायदे (Benefits Of Turmeric Milk)
हळदीमध्ये (Turmeric) अँटीऑक्सिडंट्ससह (Antioxidant) दाहक-विरोधी गुणधर्म (Anti-inflammatory Properties) जास्त प्रमाणावर आढळत असल्याने अ‍ॅलर्जीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी ती खुप गुणकारी मानली जाते.
तसेच संसर्ग आणि वेदनांपासून मुक्त होण्यासाठी हळद हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे.
हळद मधात मिसळून किंवा गरम दुधात चिमूटभर हळद घालून त्याचे सेवन करावे.
त्याचे नियमित सेवन हे बदलत्या हवामानामुळे उद्भवणार्‍या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

 

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी काय करावे (What To Do To Prevent Allergies) ?

– धूळ (Dust Allergy),रंग किंवा (Hair Dye Allergy ) परागकणांची अ‍ॅलर्जी (Pollen Allergy) असेल
तर बाहेर जाताना मास्क (Mask) घाला, मऊ कपडे (Soft Clothes) घाला.

– आजूबाजूचा परिसर धूळ (Dust Free) आणि प्रदूषणमुक्त ठेवा (Pollution Free), घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

– बंद नाक आणि सायनसपासून (Sinus) आराम मिळविण्यासाठी स्टीम इन्हेलर (Steam Inhaler) वापरा.

– अ‍ॅलर्जीच्या वेळी गरम पाणी (Hot Water) प्यायल्याने फायदा होतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार

How To Stop Nail Biting Habit | तुम्हाला सुद्धा नखे चावण्याची सवय तर नाही ना? जाणून घ्या कशी सुटका करून घ्यावी या सवयीपासून