पोलीसनामा ऑनलाइन टीम – जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपते. ऑफिसच्या कामात आणि कधी घरगुती कामामुळे कंटाळलेली असते. तेव्हा घोरते. परंतु त्याच्या शेजारी झोपलेला माणूस खूप अस्वस्थ होतो. घोरण्याचा आवाजाने अनेकांची झोप उडते. मग या समस्येपासून मुक्त होण्यासाठीचे काही घरगुती उपाय.
1. वेलची
वेलची हा या समस्येवर चांगला उपाय आहे. जर वेलची घेत असाल तर ते बंद नाक उघडते. ज्यामुळे आपल्या घोरण्याची समस्या देखील कमी होते.
असे वापरा
1. एक ग्लास पाणी घ्या
2. त्यात वेलची पूड अर्धा किंवा एक चमचा घाला.
3. निजायच्या अर्धा तास आधी प्या
2. देशी तूप
देशी
तूप देखील फायदेशीर ठरेल. देशी तूप औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे नाक उघडण्यास खूप मदत होते. आणि घोरणे समस्येवर मात केली जाते.
कसे वापरायचे
1. तूप हलके गरम करावे
2. नाकपुडीत प्रत्येकी एक थेंब टाका
3 रात्री झोपण्यापूर्वी दररोज उपाय करा
3 ऑलिव तेल
ऑलिव तेल फायदेशीर ठरेल. ऑलिव्ह ऑइल सूज कमी करते. नाकात हवा येण्या जाण्याचे प्रमाण त्यामुळे वाढण्यास मदत मिळेल.
असे वापरा
1. ऑलिव्ह ऑईलचे एक किंवा दोन घोट घ्या
2. त्यात मध घाला
3. हे दररोज करा आणि नंतर समस्या दूर होतील
4. लसूण
लसूण देखील तुमची समस्या सोडवू शकतो. घोरणे समस्या लसूण खाल्ल्याने मुळापासून संपेल.
हे कसे वापरावे
1 रात्री झोपेच्या आधी लसणाच्या एक-दोन पाकळ्या खा
2 त्यानंतर पाणी प्या
3 हे दररोज करा