दातांचा पिवळेपणा दूर करा, दात होतील पांढरेशुभ्र ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – तंबाखूचे सेवन, सिगारेट, पौष्टिक आहार न घेणे, दातांची स्वच्छता न करणे यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो. हा पिवळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती व नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येतो. या पदार्थांमधील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज दातांमधील बॅक्टेरिया नष्ट करून दातांची चमक वाढवतात. हे पदार्थ कोणते आहेत, ते कसे वापरावेत, यासंदर्भातील माहिती आपण घेणार आहोत.

दातांवर बेकिंग सोडा लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. तसेच संत्र्याचे साल वाळवून पावडर बनवून दातांवर लावल्याने दातांची चमक वाढते. ऑलिव्ह ऑइल दातांवर लावावे. आणि पाच मिनिटांनंतर पाण्याने धुवावे. यामुळे दात चमकतात. ब्रश केल्यानंतर दातांवर खोबरेल तेल लावल्यास दातांची चमक टिकते. स्टड्ढॉबेरी बारीक करून पेस्ट बनवून त्याने दातांची हलक्या हाताने मालिश केल्याने दात चमकतात. सफरचंदाचा पल्प दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात.

हे चावून खाल्ल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो. लिंबाचे साल दातांवर हलक्याने घासल्याने दातांची चमक वाढते. अक्रोडची पेस्ट बनवून दातांवर हलकी मालिश केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. तुळशीची पाने बारीक करून दातांवर लावून मालिश केल्याने दातांची चमक वाढते. मिठामध्ये सरसोचे तेल मिसळून दातांवर हलक्याने मालिश केल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/