दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दात किडणे ही एक सामान्य समस्या आहे. रोज सकाळी आणि रात्री ब्रश न केल्याने दात किडू लागतात. दात किडलेले असतील तर त्यापासून सुटका मिळवणे खुप महागडे आणि वेदनादायी असते. यामुळे तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा आराम मिळवू शकता. या उपायांनी सुद्धा कमी वेळात लाभ होईल.

दात किडण्याची ही आहेत कारणे
1. योग्यप्रकारे काळजी न घेणे
2. जास्त गोड खाणे
3. रात्री झोपण्यापूर्वी दातांची स्वच्छता न करणे
4. पान, मसाला, तंबाखूचे सेवन करणे

करा हे घरगुती उपाय
1. कॉटन बॉलमध्ये थोडे जायफळ ऑईल टाका आणि तो किड लागलेल्या दात किंवा दाढेमध्ये ठेवा. किमान 5 मिनिटे ठेवा. यामुळे झिणझिण्या आल्यासारखे वाटेल पण होऊद्यात. 5 मिनिटानंतर कॉटन काढून टाका.

2. दोन-तीन लवंग वाटून किडलेल्या ठिकाणी लावा. लवंग तेलसुद्धा लाभदायक ठरते.

3. हिंगाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सुद्धा आराम मिळतो.

4. लिंबाच्या काडीने दात घासल्याने कॅव्हिटीची समस्या दूर होते.

5. लसणात अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात. याची पेस्ट लावल्याने किड लागण्याच्या समस्येत आराम मिळतो.

6. शुद्ध एलोवेरा जेल थोड्या प्रमाणात घेऊन फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर दातावर लावा. सुमारे 5-10 मिनिटे ठेवा आणि नंतर गुळणी करा.