थकवा आणि अशक्तपणाचे आयुर्वेदिक औषध : ‘कोरोना’ची तीव्र लक्षणे म्हणजे थकवा- अशक्तपणा, ‘हे’ 10 घरगुती उपचार देतील आराम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटणेदेखील कोरोना विषाणूचे एक प्रमुख लक्षण आहे. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण होते तेव्हा त्याला कोरडा खोकला आणि ताप तसेच थकवा जाणवू शकतो. इतकेच नाही तर हे लक्षण बरे झालेल्या रुग्णांमध्येही दिसून येते.

जर तुम्हाला कोरोना कालावधीत कठोर परिश्रम न करताही थकवा, शरीरात वेदना आणि पायऱ्या चढताना दम लागणे यांसारख्या समस्या येत असल्यास ते कोरोनाचे लक्षण असू शकते. दैनंदिन थकवा आणि अशक्तपणाचा दैनंदिन जीवनावरही वाईट परिणाम होऊ शकतो. आम्ही आपल्याला थकवा आणि अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

टोमॅटो सूप

ताजे टोमॅटो सूप पिण्यामुळे भूक वाढते आणि शरीरात रक्ताची कमतरता दूर होते. या उपायाने शारीरिक दुर्बलतादेखील दूर होते.

कॉफी

कॉफीचे सेवन केल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो आणि शरीरामध्ये ऊर्जा येते. जेवणानंतर कॉफी प्यायल्याने पोट हलके होते.

मीठ आणि थंड पाणी

स्नायूतील अशक्तपणा दूर करण्यासाठी, थोडे मीठ घ्या आणि थंड पाण्यात मिसळा आणि नंतर त्याने संपूर्ण शरीरावर मालिश करा. हा उपाय केल्यास शरीराच्या स्नायूंना आराम मिळेल.

पिपळाच्या पानांचा मुरब्बा

शरीराची दुर्बलता दूर करण्यासाठी पिपळाच्या पानांचा मुरंबा फायदेशीर आहे.

पुरेशी झोप घ्या

ताजे आणि ऊर्जावान होण्यासाठी सकाळी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. निरोगी होण्यासाठी 7-8 तास झोपावे. हे शरीराची हरवलेली ऊर्जा परत आणण्यास मदत करते. जर आपल्याला दिवसा थकल्यासारखे वाटत असेल, तर आपण थोडीशी झोप घेऊ शकता.

8 ग्लास पाणी

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज 8-9 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. हे शरीर हायड्रेटेड आणि ऊर्जावान ठेवते. जेव्हा जेव्हा आपल्या शरीरात ऊर्जा कमी होत असेल, तेव्हा एक ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

जीवनसत्त्वेदेखील महत्त्वपूर्ण आहेत

शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करण्यासाठी कोशिंबीर खाणे गरजेचे आहे. दररोज एक ग्लास दूध पिल्याने शरीराची कमजोरीदेखील दूर होते.

दालचिनी पूड

जर आपणदेखील शरीराच्या कमकुवतपणामुळे म्हणजेच वारंवार होणारी थकवा यामुळे त्रस्त असाल तर दररोज दालचिनीची पावडर मधाबरोबर घ्या. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

अश्वगंधा चूर्ण

दिवसात दोनदा दुधाबरोबर जायफळ, जावित्री आणि अश्वगंध चूर्ण सेवन केल्याने शरीरात शक्ती येते, त्याबरोबर रक्ताची कमतरता म्हणजे लोहाची कमतरता दूर होते. ज्यामुळे शरीराला अशक्तपणा आणि थकवापासून आराम मिळतो.

बदाम

पाच बदाम आणि पाच खजूर नियमितपणे खाल्ल्याने शरीरात शक्ती येते. ज्यामुळे शरीराला कमी थकवा जाणवतो. रात्री गहू किंवा मनुका भिजवून आणि सकाळी त्याचे पाणी घेतल्यास काही दिवसांत शरीराची दुर्बलता दूर होते.