वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय जरूर करा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा आपल्याकडे खूप उशीरा निर्माण होते. तरूणपणात हा विचारही बहुतांश जणांच्या मनात येत नाही. मात्र, एकदा चाळीशी ओलांडली की मग वेध लागतात ते आरोग्यदायी जीवनाचे. खरोखरच आरोग्यदायी जीवन हवे असेल तर त्याची सुरूवात तरूण्यातच केली पाहिजे. सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आहार, कामाच्या वेळा पूर्णपणे बिघडल्या आहेत. त्याचा परिणाम शरीरावर होत असून अनेक आजार कमी वयातच त्रास देऊ लागतात. लठ्ठपणा हा आजार देखील सध्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. लठ्ठपणामुळे इतर आजार सहज शरीरात शिरकाव करतात. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे खूप जरूरी आहे.

स्पर्धात्मक जीवनामुळे सतत तणावाखाली माणसांना काम करावे लागत आहे. याचे दुष्परिणाम ताबडतोब दिसून येतात. लठ्ठपणा, डायबिटीस, ब्लडप्रेशर, डिप्रेशन इत्यादी त्रास सुरू होतात. यासाठी वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.

अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी असून ते सडपातळ होण्यासाठी परिणामकारक असते. अक्रोड टरफलासोबतच खावे. यामुळे जास्त खाण्याची इच्छा होणार नाही आणि शरीरासही नुकसान होणार नाही. तसेच तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. २००९ मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एका स्वयंसेवकाने दररोज ६ ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन ५ पट वेगाने कमी झाले. आणखी एक उपाय म्हणजे बटाटे खाणे. बटाटा खाणे कंबरेसाठी सर्वाधिक घातक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मात्र, ते तळलेल्या बटाट्याबद्दल त्यांनी म्हटले आहे. भाजलेल्या किंवा उकळलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे चांगला आहार आहे. चे प्रमाण अधिक असलेल्या या आहारात क जीवनसत्त्वाचेही जास्त प्रमाण आढळून येते. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे.

वाढत्या वयाबरोबर स्नायू कमजोर होऊ लागतात. यामुळे चयापचय प्रक्रिया क्षीण होते. व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तसेच काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचे कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हे खाल्याने चरबी वेगाने कमी होते. आणि वजनावर नियंत्रण ठेवता येते.