‘बेकिंग’ सोडा व लिंबाच्या मदतीने हटवा ‘दातांचा’ पिवळेपणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्याला कुठेही चांगले स्मितहास्य करायचे असेल तर आपले दात स्वच्छ असावे लागतात. तरच आपल्या स्मितहास्याचा कुठेही प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या स्मितहास्याने कोणावरही प्रभाव पाडायचा असेल तर आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, सध्या अनेक आजारांवरील गोळ्यांच्या सेवनाने किंवा तंबाखूच्या सेवनाने आपले दात पिवळे पडतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पिवळे दात पांढरे करायचे असतील तर तुम्ही बेकिंग सोडा व लिंबू यांच्या मदतीने आपल्या दातांचा पिवळेपणा घालवू शकता.

बेकिंग सोडा व लिंबू हे आपल्या स्वयंपाकघरात सर्रासपणे वापरलं जात. तुम्हाला पांढरे दात मिळवण्यासाठी सोडा व लिंबू नक्कीच परिणामकारक आहे. बेकिंग सोडा हा खरखरीत असल्याने तो दातांवर स्क्रबर म्हणून काम करतो. तर लिंबात सायट्रिक अ‍ॅसिड असल्याने, लिंबू ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. बेकिंग सोडा हा अल्कलाईन स्वरूपात असल्याने तो लिंबाच्या रसातील अ‍ॅसिडीक क्षमता कमी करतो व दात शुभ्र करण्यासाठी मदत करतो.

अशा पद्धतीने बनवा बेकिंग सोडा आणि लिंबाचे मिश्रण

१) चमचाभर बेकिंग सोड्यात, लिंबाचा रस एकत्र करून त्याची घट्ट पेस्ट बनवा.

२) टुथब्रशच्या सहाय्याने ही पेस्ट दातांवर लावा व मिनिटभरासाठी राहू द्या.

३) त्यानंतर नीट चूळ भरा व तोंड स्वच्छ करा.

असे केल्यास तुमचे पिवळे झालेले दात लवकर पांढरे होण्यास मदत होईल.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like