‘दात’ किडण्याची समस्या होईल दूर, ‘हे’ 6 ‘खास’ उपाय आवश्य करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – तोंडाची स्वच्छता आणि आरोग्य यांचा खुप जवळचा संबंध आहे. जर दातांची आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर अनेक आजार निर्माण होऊ शकतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे दात किडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. दात दुखणे तसेच दात किडण्याची समस्या लहानांसह मोठ्यांमध्ये जास्त दिसून येते. याचा त्रास असह्य असा असतो. यामुळे गाल तसेच कान दुखण्याची समस्या सुध्दा होते. यावर पेनकिलर हा उपाय नसून नियमितपणे काळजी घेणे हा उपाय आहे. दातांचे आरोग्य चांगले ठेवणे हा यावर उपाय आहे. यासाठी कोणते उपाय करावेत, हे जाणून घेवूयात.

हे उपाय करा

1 हळद
पांढरे आणि चमकदार दातांसाठी हळदीचा वापर करा. यासाठी हळद बोटांवर घेऊन दातांना घासा. यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांतून रक्त येत नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

2 पेरूची पाने
पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावा. यामुळे दात मजबूत होतात. पेरूची पाने पाण्यात उकळून त्या कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातांना बळकटी मिळते.

3 लिंबाची पाने
लिंबाच्या पाल्याने दात घासा. यातील अँटी-माइक्रोबियल गुण असल्याने कॅविटीज होत नाही. लिंबाच्या पानांची पेस्ट करून लावू शकता.

4 लवंग
दात किडने, दुखणे या समस्येवर लवंगाच्या तेलाचा वापर करा. तसेच कापूस राईच्या तेलात बुडवून दातांमध्ये ठेवू शकता.

5 लसूण
कॅविटीजचा सामना करण्यासाठी तसेच दातांना आणि तोंडाला येत असेलला वास दूर करण्यासाठी लसूण उपयोगी आहे.

6 मीठ
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सुध्दा दात निरोगी राहतात.

हे लक्षात ठेवा
साखर किंवा साखरयुक्त चिकट पदार्थ खाल्याने ते दातांना, दाढांना चिकटून राहतात. दाढ किडायला सुरूवात होते. यासाठी खाल्यानंतर गुळण्या करा. खाल्यानंतर ब्रश करा. यामुळे कॅविटीज होणार नाहीत.