Home Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7 घरगुती उपाय, मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies of Cavity Pain | जर एकदा दातांमध्ये कॅव्हिटीची समस्या झाली तर ताबडतोब डेंटिस्टकडे जाणे आवश्यक आहे. परंतु जर वारंवार वेदना होत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies of Cavity Pain) करू शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात…

1. मीठाच्या पाण्याने गुळण्या
जर दातात वेदना होत असतील तर कोमट पाणी घेवून त्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करा. असे केल्याने हिरड्यांची सूज आणि वेदनांपासून आराम मिळेल.

2. हायड्रोजन पेरॉक्साईडपासून गुळणी
जर तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईडने दिवसात 3 ते 4 वेळा गुळणी केल्यास तुमच्या हिरड्यांची सूज कमी होऊ शकते.

3. तुरटीच्या पाण्याने करा गुळणी
रोज सकाळी ब्रश केल्यानंतर तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास वेदनांपासून आराम मिळेल.

4. गरम किंवा थंड शेक घ्या
गरम पाणी किंवा आईस पॅकने दात शेकवा. यामुळे थोड्यावेळासाठी वेदनांपासून आराम मिळेल. कॅव्हिटीमध्ये कठिण पदार्थ खाऊ नका.

5. पेपरमिंट टी बॅग
पेपरमिंट टी बॅग गरम पाण्यात टाकून दात शेकवा. किंवा फ्रीजरमध्ये ठेवून शेकवा.

6. लसून
लसणाची पेस्ट वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा.

7. लवंग
दातात वेदना होत असेल तर दुखणार्‍या दाताखाली लवंग ठेवा. किंवा लवंग तेल दात आणि हिरड्यांना लावू शकता. यामुळे सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो. (Home Remedies of Cavity Pain)

Web Title :- Home Remedies of Cavity Pain | how to get rid of cavity pain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,292 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त ! जाणून घ्या आता गुंतवणूक केली तर 2021 अखेरपर्यंत किती मिळू शकतो नफा

Rupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘मनसे’च्या रूपाली पाटील संतापल्या, म्हणाल्या – ‘सुधरा रे सुधरा, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची’ (व्हिडीओ)