कधीही ऐकले नसेल ‘या’ उपायांबद्दल, सुपारी खाऊन करा उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपारीचा उपयोग माउथ फ्रेशन म्हणून अनेकजण करतात. धार्मिक कार्यात सुद्धा सुपारीला खूप महत्व आहे. पूजेच्या सामग्रीमध्ये सुपारीचा उपयोग केला जातो. विशेष म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सुपारीचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सुपारीमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनसोबतच मिनरल्सही असतात. तसेच टॅनिन, गॅलिक अ‍ॅसिड आणि लिगनीन हे घटकही आढळतात. सुपारीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे शरीर रोगांपासून दूर राहते.

दातांसाठी
३ सुपाऱ्या भाजून त्यांचे बारीक चूर्ण तयार करावे. या चुर्णामध्ये ५ थेंब लिंबाचा रस आणि एक ग्रॅम काळे मीठ मिसळावे. दररोज दिवसातून दोन वेळेस या मिश्रणाने दात घासल्यास दात मजबूत होतात.

डायबिटीज
डायबिटीजमुळे काहीवेळा तोंड कोरडे पडते. अशी समस्या असेल तर तोंडामध्ये सुपारीचा एक तुकडा ठेवावा.

दातदुखी
सुपारीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. दात खराब होय नयेत म्हणून सूपारीचे मंजन लाभदायक आहे. दात किडले असतील तर सुपारी जाळून मंजन तयार करावे. या मंजनाने दात घासल्यास किडत नाहीत.

उच्च रक्तदाबा
सुपारी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. सुपारीमधील टॅनिन तत्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

डिप्रेशन
सुपारी खाल्ल्याने तंत्रिका तंत्र उत्तेजित होते. सुपारी चघळत राहिल्यास तणाव दूर होतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

You might also like