Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies of Stress Relief | पूर्वी लोक एकमेकांशी बोलत असत त्यामुळे मनावरील ओझे हलके होत होते. परंतु आजच्या मशीन युगात सर्वकाही इतके वेगवान आहे की लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही. एक्सरसाईजसाठी लोकांना वेळ नाही. यामुळे मानसिक ताण-तणाव वाढत चालला आहे. स्ट्रेसमुळे वैयक्तिक जीवन प्रभावित होत असेल तर कोणते घरगुती उपाय (Home Remedies of Stress Relief) करता येऊ शकतात ते जाणून घेवूयात.

1. तुळस (tulasi)

तुळस सर्दी, खोकला आणि ताप इत्यादीवर गुणकारी आहे. तुळस तणाव कमी करण्यात मदत करते. कामावरून घरी परतल्यानंतर तुळशीची पाने पाण्यात उकळवून त्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्या. खुप आराम मिळतो. यामुळे इतर समस्याही दूर (Home Remedies of Stress Relief) होतात.

2. अश्वगंधा (ashwagandha)

अश्वगंधा सुद्धा तणाव दूर करण्यासाठी उपयोगी आहे. यात अँटी-स्ट्रेस गुण असतात. रोज रात्री झोपताना कोमट दूधासोबत अश्वगंधा चूर्ण घ्या. यामुळे तणाव दूर होतो. कमजोरी दूर होते आणि झोप चांगली येते.

 

3. ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी वजन कमी करण्यासह स्ट्रेस कमी करते. सामान्य चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्या.

4. लव्हेंडर ऑईल (Lavender oil)

लव्हेंडर ऑईल स्ट्रेस दूर करण्यासाठी चांगले आहे. यामुळे मूड फ्रेश होतो.
लव्हेंडर ऑईलचा सुवास हॅप्पी हार्मोन्स वाढवण्याचे काम करते.
कोणत्याही तेलात लव्हेंडर ऑईलचे दोन ते चार थेंब टाकून डोक्याला मसाज करू शकता.
याशिवाय डिफ्यूजरमध्ये लव्हेंडर ऑईल टाकून अरोमाथेरेपी घेतल्यास खुप आराम मिळेल.

5. बदाम आणि अक्रोड (Almonds and walnuts)

बदाम आणि अक्रोड मेंदूची ताकद वाढवतात. काम केल्यानंतर येणारा थकवा दूर करण्यासाठी बदाम आणि आक्रोड भिजवून नंतर ते वाटून कोमट दूधातून प्या.

Web Titel :- Home Remedies of Stress Relief | if your personal life is affected due to stress these home remedies can be helpful

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’