पावसाळ्यातील ताप ‘डेंग्यू’चा आहे की ‘कोरोना’चा कसं ओळखाल ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरातील लोक कोरोना विषाणूच्या महामारीने त्रस्त आहेत. भारतातील रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी असला तरी दिवसेंदिवस संक्रमणाचा धोका वाढत चालला आहे. भारतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरोनासोबत डेंग्यूचा आजार पसरण्याची भीती जास्त आहे.

डेंग्यू हा आजार Aedes हा डास चावल्यामुळे होतो. डेंग्यू आणि कोविड-19 ची सुरुवातीची लक्षणं एकसारखी असतात. कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन आणि डेंग्यू या दोन्ही आजारात रुग्णाला ताप येतो. या दोन्ही आजारांची सुरुवातीची लक्षणं सारखीच असतात. या दोन आजारांमधील फरक कसा ओळखायचा हे जाणून घेऊयात.

डेंग्यू या आजारामध्ये व्यक्तीला उलटी, सुज येणं, रॅशेज अशी लक्षणं दिसतात. गंभीर स्थितीत सतत उलटी येणं, श्वास देण्याचा वेग वाढणं, पोटात दुखणं, हिरड्यांमधून रक्त बाहेर येणं, उलटीमधून रक्त बाहेर येणं अशी लक्षणं दिसून येतात. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यास रुग्णाला सुरुवातीला ताप, कफ आणि खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच वास न येणं, त्वचेवर रॅशेज येणं, चव न समजणं अशी लक्षणं दिसून येतात. दोन्ही आजारात डॉक्टरांकडून तपासणी करणं गरजेचं आहे.

डेंग्यूसाठी घरगुती उपाय
डेंग्यूपासून बचावासाठी तुम्ही गुळवेलाचा रस पिऊ शकता. गुळवेलाच्या रसामुळे मेटाबोलिज्म व्यवस्थित होते. तसेच रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यास आजारांशी लढता येऊ शकतं. गुळेलाचा रस सगळ्यात गुणकारी असतो. कारण या आजारामध्ये प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात. त्यामुळे तुमचा जिवाला धोका होऊ शकतो.

जर तुम्ही गुळवेलाच्या रसाचे सेवन केलं तर डेंग्यु होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यात येतो. रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळवेल फायदेशीर असतं. त्यामुळे डायबेटीस होण्यापासून रोखता येईल.एका अभ्यासानुसार गळवेलाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासूनही बचाव करता येऊ शकतो. तसेच तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात.

गुळवेलामुळे शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुद्धा दूर शारीराबाहेर टाकण्यात मदत करते. यामध्ये पचनाचे विकार आणि ताण-तणाव दूर करणारे गुण असतात. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. यामुळे भूकही चांगली लागते. तसेच तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.

कसा करायचा वापर
गुळवेल आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी एक कप गुळवेल घेतल्यास त्याच्यात दोन ग्लास पाणी घालावे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे. गुळवेलाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.