अंगाला सतत खाज येतेय ? जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण शरीराला खाज येण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. याची विविध कारणं असू शकतात. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) बेकिंग सोडा आणि लिबू – अंगाला सतत खाज येत असेल तर अंघोळ करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा. या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. 2 आठवड्यातच तुम्हाला यामुळं आराम मिळेल.

2) चंदन – शरीरावर ज्या ठिकाणी खाज येते त्याठिकाणी चंदनाचा लेप लावावा. यामुळं शरीराचा दुर्गंध आणि खाज दोन्हीही दूर होतं.

3) तुळस – शरीरावर एखाद्या ठिकाणी खाज सुटली असेल तर त्याठिकाणी तुळशीची काही पानं चोळावीत. किंवा या पानांचा काढा बनवूनही तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावू शकता.

4) खोबरेल तेल – त्वचा कोरडी पडल्यानं किंवा एखाद्या कीटकानं दंश केला तर त्याठिकाणी खाज येते. सतत एकाच ठिकाणी खाजवलं तर त्याठिकाणी लाल चट्टे येतात. असं असेल तर खाज येत असलेल्या भागावर खोबरेल तेल लावावं. यामुळं शरीरावरील खाज कमी होते.

5) कोरफड – शरीरावर खाज येत असेल तर त्याठिकाणी कोरफडीचा गर लावावा. काही वेळ ठेवल्यानंतर तो भाग पाण्यानं स्वच्छ करून घ्यावा. यामुळं खाज आलेल्या भागावर कोणत्याही प्रकारचे लाल चट्टे येत नाहीत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.