दालचिनी ते गुलाबपाणी, ‘हे’ घरगुती उपाय करून ब्लॅकहेड्सची समस्या करा दूर !

अनेक तरुण-तरुणी ब्लॅकहेड्सच्या समस्येनं त्रस्त असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक उपाय करूनही कधी कधी यापासून सुटका मिळत नाही. आज आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) बेकिंग सोडा आणि लिंबू – घरात सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या मदतीनं आपण ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतो. यासाठी एक लिंबू घेऊन ते मधोमध कापा. यातील एका फोडीवर बेकिंग सोडा टाकून ते लिंबू चेहऱ्यावर आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी चोळा. तसंच ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी काही वेळ लिंबू तसंच दाबून ठेवा. 5-6 मिनिटे या लिंबानं चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

2) टोमॅटो – अनेकदा टोमॅटोच्या रसाचा स्क्रब म्हणून सुद्धा वापर केला जातो. तसंच त्याचा उपयोग ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही करता येतो. टोमॅटोचा रस काढून तो चेहऱ्याला लावा. ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी या रसानं मसाज करा.

3) दालचिनी – एक चमचा दालचिनी पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळा करा.

4) गुलाबपाणी – लहान चमचा मीठ आणि गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर मसाज करा. हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळा करा.

5) कोरफडीचा रस – अनेक त्वचाविकारांवर कोरफड गुणकारी आहे. तसंच ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी देखील तिचा वापर केला जातो. यासाठी कोरफडीच्या रसात हळद मिक्स करून हा लेप ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावावा. त्यानंतर 15-20 मिनिटे तो तसाच चेहऱ्यावर वाळू द्यावा. हा लेप सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर एखाद्या उत्तम ब्रँडचं मॉईश्चरायजर लावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.