अप्पर लिप्स हेअर्सपासून सुटका हवीय ? जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फेशियल हेअर खास करून अप्पर लिप्स हेअर्स सर्वच मुलींची डोकेदुखी आहे. या केसांची ग्रोथही लवकर होत असते. त्यामुळं सतत मुलींना पार्लरला जावं लागतं आणि खर्चही करावा लागतो. आज आपण याासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जेणकरून तुम्ही सहज हे केस काढू शकाल आणि याची ग्रोथही कमी करता येईल.

1) हळद – एक चमचा हळद आणि अर्धा चमचा पाणी एकत्र करा. ही पेस्ट अप्पर लिप्सला लावा. सुकल्यानंतर रब करून थंड पाण्याच्या मदतीनं हे काढून टाका. रब करताना केसांची ग्रोथ ज्या दिशेनं होते त्याच्या विरुद्ध दिशेनं रब करा. हा प्रयोग महिन्यातून 4-5 वेळा करावा. यामुळं केसांची वाढ कमी होते.

2) लिंबू आणि साखर – दोन चमचे लिंबाचा रस घेऊन यात अर्धा चमचा साखर टाकावी. साखर विरघळल्यानंतर ही पेस्ट लव असणाऱ्या भागावर लावावी. 15 मिनिटांनंतर ही पेस्ट थंड पाण्याच्या सहाय्यानं धुवून घ्यावी. यामुळं ओठांवर असलेली अतिरीक्त लव आपोआप कमी होते. हा प्रयोग महिन्यातून 2-3 वेळा करावा.

3) एग व्हाईट – एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग काढून घ्या. यात हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि एक चमचा साखर एकत्र करा. तुम्ही यासाठी पिठीसाखरही वापरू शकता. ही पेस्ट अपर लिप्सवर लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर हेअर ग्रोथ होत असलेल्या विरूद्ध दिशेनं खेचून काढा. नंतर चेहरा थंडा पाण्यानं धुवून घ्या.

4) दही आणि बेसन – दही आणि बेसन यांच्या वापरामुळं चेहऱ्यावरील अतिरीक्त केस कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा बेसन घ्यावं. त्यात किंचित हळद टाकावी. ही पेस्ट अप्पर लिप्सला लावावी. सुकल्यानंतर हातानं चोळून ही पेस्ट काढावी आणि पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

5) ओट्स – एक चमचा ओट्स घेऊन त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट अप्पर लिप्सवर लावा. जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छा धुवून घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.