Dandruff | तुमच्या मुलांच्या डोक्यात कोंडा झाला आहे का? ‘हे’ सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्याप्रमाणेच लहान मुलांच्या डोक्यात देखील कोंडा (Dandruff ) ही समस्या सामान्य आहे. यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, कोरडेपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसे, हे टाळण्यासाठी बाजारात बरीच उत्पादने उपलब्ध आहेत. आपण या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. अशाप्रकारे कोणतेही दुष्परिणाम न होता आपण आपल्या मुलांच्या डोक्यातील कोंडा (Dandruff ) सहजपणे दूर करू शकता.

1) लिंबाचा रस
कोंडाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू खूप फायदेशीर मानला जातो. हे एक नैसर्गिक एक्‍सफोलिएटर म्हणून कार्य करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. अशा परिस्थितीत टाळूवर जमा होणारे फलैक्स कमी करण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी मानला जातो.

अशाप्रकारे वापर करा
यासाठी 1 चमचा लिंबाचा रस 4 चमचे पाण्यात मिसळा. नंतर हे मिश्रण मालिश करत संपूर्ण टाळूवर लावा. 20 मिनिटांसाठी तसेच राहू द्या नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.

2) अंडी अंड्यातील पिवळ बलक, ऑलिव्ह आणि नारळ तेल
टाळूवरील कोंडाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण अंड्यातील पिवळ बलक, ऑलिव्ह आणि नारळ तेल देखील वापरू शकता. हे केस चांगले स्वच्छ करेल. तसेच खाज सुटणे, कोरडेपणा यासारखे समस्या कमी होतील व केस सुंदर,दाट ,कोमल दिसतील.

अशाप्रकारे वापर करा
यासाठी एका वाटीमध्ये तिन्ही वस्तू टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. तयार मिश्रण मालिश करत टाळूवर लावा. 20 मिनिटांपर्यंत किंवा कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुवा.

3) बेकिंग सोडा आणि लिंबू
लहान मुलांच्या डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबू देखील वापरू शकता. यामुळे कोंडयाची समस्या दूर होईल आणि केस लांब, जाड आणि मजबूत होतील.

अशाप्रकारे वापर करा

यासाठी, 1 चमचा बेकिंग सोडयामध्ये 2 चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण हलक्या हातांनी मालिश करून टाळूवर लावा. 10-15 मिनिटे तसेच सोडा. त्यानंतर पाण्याने केस धुवा.

4) कडूलिंब
बॅक्टेरियाविरोधी, अँटी-सेप्टिक, अँटी-फंगल गुणधर्म असलेल्या कडूलिंबामुळे डोक्यातील कोंडा काढून टाकण्यास मदत होते. तसेच डोक्यातील जळजळ, खाज सुटणे इत्यादी समस्याही दूर होतात.

अशाप्रकारे वापर करा
कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात थेंबभर पाणी घाला. तयार मिश्रण मालिश करत टाळूवर लावा.आणि ते 30 मिनिटे तसेच सोडा. नंतर सौम्य शैम्पूने धुवा.

5) अंडी
कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरडी टाळू. या प्रकरणात, आपण यासाठी अंडी वापरू शकता. हे आपल्याला कोरडेपणा दूर करण्यास आणि बराच काळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल. केस मजबूत होऊन केस गळण्याची समस्या दूर होईल आणि केस जाड आणि लांब होतील.

अशाप्रकारे वापर करा
यासाठी 1 अंड्यात 1 लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण मुलाच्या टाळूवर 30 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर प्रथम थंड पाण्याने केस धुवा. नंतर केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

Web Titel :- home remedies to get relief from Dandruff

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या