‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय करा आणि ‘डोळे’ चांगले ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या दृष्टीवर देखील झाला आहे. आहार आणि कामाचे स्वरूप यामुळे डोळ्यांवर लवकर वाईट प्रभाव पडतो. मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनचा जास्त वापर हीदेखील या मागील कारणे आहेत. सध्या अनेक लहान मुलांना सुद्धा चष्मा लागल्याचे आपण पाहातो. एकुणच तरूण वयात चष्मा वापरणार्‍या लोकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जर चष्मा टाळायचा असेल आणि दृष्टी मजबूत ठेवायची असेल, तर काही घरगुती आणि सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

1 त्रिफळा पावडर
एक टिस्पून त्रिफळा पाऊडर एक ग्लास पाण्यात मिसळून हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवून द्या. सकाळी हे मिश्रण गाळून त्याने डोळे धुवा. मात्र, पाणी स्वच्छ असावे. एक महिना हा उपाय केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

2 राईचे तेल
डोळ्यांसाठी राईचे तेल लाभदायक आहे. राईचे तेल गरम करून दररोज रात्री पायांच्या तळव्यांना घासा. राईचे तेल तळपायांना लावून मसाज केल्याने डोळे चांगले राहतात.

3 कोथिंबिरीचा रस
कोथिंबिरीचा वापर केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहाते. ताज्या कोथिंबिरीचा रस काढून घ्या. हा रस दररोज डोळ्यात घालून डोळे 10 मिनिटे बंद करून ठेवा. या उपायाने डोळ्यांची समस्या दूर होते.

4 गाजराचा रस
गाजराचे सेवन करून डोळ्यांचे आरोग्य राखता येते. यामध्ये व्हिटामीन ए असते. दररोज सकाळी गाजराचा रस प्या. डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.