घरावर दरोडा टाकल्यानंंतर सामूहिक ‘बलात्कार’ करायचे हे 3 ‘नराधम’, अडीच किलो सोन्यासह 20 वर्षानंतर ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोएडा पोलिसांना एक मोठी सफलता मिळाली आहे. नोएडा पोलिसांनी एटा पोलिसांच्या सहयोगाने फर्रुखाबादमध्ये दरोड्याच्या घटनेतील वॉन्टेड असलेले 50 – 50 हजाराचे बक्षिस असलेले तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सध्या त्यांची चौकशी करत आहेत.

2001 पासून करत होते गुन्हे 
पोलिसांच्या मते हे तिघे भटक्या जमातीचे सदस्य आहेत. हे लोक घरात चोरी आणि डाके घालत असतं. त्याचबरोबर ज्या घरात ते दरोडा टाकत त्या घरात ते महिलेवर अत्याचार, बलात्कार करत. आरोपींनी 2001 मध्ये मोहम्मदाबात फार्रुखाबादमध्ये 2 भावाची हत्या करुन घरात दरोडा टाकला होता.

2008 साली कपिनने फार्रुखाबदामध्ये दरोडा टाकला होता. तर 2016 मध्ये रबपुरा गौतमबुद्ध नगरमध्ये वीट भट्टीवर दरोडा टाकला होता आणि सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर आरोपी लल्ला आणि आकाश फरार होते. यानंतर 2017मध्ये मोहम्मदाबाद फर्रुखाबादमध्ये त्यांनी एका घरात दरोडा टाकला होता ज्यात रोख रक्कम आणि दागिणे आणि एक डबल बॅरल बंदूक घेऊन फरार झाले होते.

2.5 किलो सोनं जप्त
पोलिसांनी सांगितले की एक वर्षापासून ते एटामध्ये राहत होते. या दरम्यान त्यांनी जनपद एटामध्ये दरोडा आणि चोरीचे 12 गुन्हे केले. त्यांच्याकडून 2.5 किलो सोनं, 1 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/