‘एनईएमएस’मध्ये घरकामगार दिन साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपला कुणीतरी सत्कार करील हे माझ्यासाठी स्वप्न होते. सत्काराची भीतीही वाटत होती. परंतु आज या शाळेत सत्कार स्वीकारल्यानंतर बहुमान आणि आनंद वाटत असल्याची भावना शालिनी होडे या घरकाम करणार्‍या मावशींनी व्यक्त केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (एनईएमएस) जागतिक घरकाम दिनाचे औचित्य साधून घरकाम करणार्‍या मावशींचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मावशींप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे केली.

सुनीता कदम, सुरेखा ज्वारी, सुमन खोपडे, शालिनी होडे, संगीता गोरखे, सावित्री चोपडे या मावशींचा यावेळी सन्मान करण्यात आला. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. सविता केळकर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, पूर्व प्राथमिकच्या प्रमुख शिल्पा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये घरेलू काम करणार्‍यांप्रती सन्मान आणि समानतेची भावना निर्माण व्हावी. श्रमाचे मोल आणि श्रमप्रतिष्ठेचा संस्कार रुजावा यासाठी उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. केळकर यांनी दिली.

प्रीतम जोशी यांनी प्रास्ताविक आणि अनघा पोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/