पैशांच्या वादातून होमगार्डचा खून, तासाभरात आरोपीला बेड्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पैशाच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून होमगार्डच्या जवानाचा गळा चिरून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना किराडपुरा येथील हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकऱणी पोलिसांनी खून करणाऱ्या बांधकाम ठेकेदाराला तासाभरात अटक केली आहे.

सय्यद शफी अहमद सय्यद शकील (वय ४०, नागसेन कॉलनी, रोशनगेट परिसर) असे खून झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर जमील खान हुसेन खान (वय ३६, बारी कॉलनी) असे अटक कऱण्यात आलेल्याचे आहे.

जमील याने व्यवसायासाठी सय्यद शफी अहेमद यांच्याकडून उसने पैसे घेत होता. दरम्यान त्याने घेतलेल्या पैशांपैकी ७५ हजार रुपये जमीलकडे होते. तो पाच ते सहा महिन्यांपासून पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर सय्यद शफीला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी आरोपी जमीलकडे पैशांसाठी तगादा लावला होता.

दरम्यान शफी चार दिवसांपासून लोकसभा निवडणूकीच्या बंदोबस्तात व्यस्त होते. शफी यांनी त्याला फोन करून उद्या पैसे देण्यास सांगितले होते. त्यानंतर बुधवारी त्याने किराडपुरा येथील हॉटेल औरंगाबाद येथे शफी यांना बोलवले. शफी यांनी भावाला सांगितले की ते किराडपुरा येथे पैसे आणण्यासाठी जात आहेत. त्यानंतर ते हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांचा जमीलशी पैशांवरून वाद झाला. त्यातूनच त्याने धारदार शस्त्राने गळा चिरून शफी यांचा खून केली. हा प्रकार हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या लोकांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी शफीला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु गळा खोलपर्यंत चिरला गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शफी यांचा खून करून जमील पसार झाला होता. तो किराडपुरा येथील एका घरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.