356 दिवस काम मिळावे, जनता दरबारात होमगार्ड्सची अप्पर पोलीस अधिक्षकांकडे मागणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात होमगार्ड्सच्या जनता दरबाराचे आजोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.भुजबळ यांनी होमगार्ड यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

सविस्तर माहिती अशी की, मुख्यालयातील कवायत मैदानात शुक्रवारी होमगार्ड यांच्या अडीअडचणी जाणुन घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात एकून 150 महिला, पुरुष होमगार्ड उपस्थित होते. यावेळी होमगार्ड यांनी अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. भुजबळ यांच्याकडे अनेक मागण्या केल्या. या दरबारात दोन महिने ड्युटीवर असलेले कर्मचारी, आठ दिवस उजळणी शिबीरातील प्रशिक्षणार्थी होमगार्ड सहभागी झाले होते.

होमगार्ड यांच्या मागण्या –

– 365 दिवस काम मिळावे आणि 670 रुपये रोज मिळावा.
– तीन वर्षांपासून होमगार्ड्सना गणवेश, टोपी, लोगो साहित्य वाटप झालेले नाही ते त्वरीत मिळावे.
– होमगार्ड राहतात त्या भागतील पोलीस स्टेशन हद्दीतच बंदोबस्त मिळावा.
– ऑनलाइन कामकाजाबाबत अगोदर माहिती द्यावी व नंतर अंमलबजावणी करावी.
– ज्यांचे वय 50 वर्ष आहे त्यांना 800 मीटर ग्राउंड ची सक्ती नसावी.

होमगार्ड शिवाय बंदोबस्त अपूर्ण –

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ भुजबळ यांनी होमगार्ड्सना मार्गदर्शन केले. डाॅ. भुजबळ म्हणाले की, पोलीस ज्या प्रमाणे आपले कर्तव्य बजावतो त्याच प्रमाणे होमगार्ड देखील कार्य करतो. बंदोबस्तावेळी होमगार्डची भरीव मदत होत असते. होमगार्ड शिवाय बंदोबस्त पुर्ण होत नाही. लवकरात लवकर वरिष्ठांशी संपर्क करुन होमगार्ड्सच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. यावेळी राखीव पोलीस उपनिरीऊक एस.बी.राठोड, प्रशिक्षक के. एस.खैरनार यांसह जिल्ह्यातील होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/