Coronavirus : रस्त्यावर झोपणार्‍यांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार ‘या’ देशाचं सरकार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर पसरले असून प्रत्येक देश या व्हायरसच्या संक्रमणाला कमी करण्यासाठी काम करत आहे. अशात एक देश असा प्रकल्प सुरु करणार आहे ज्याअंतर्गत रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना या व्हायरसपासून वाचवण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले जाईल.

हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील असून रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना तब्बल २०,००० रु. भाडे असलेल्या हॉटेलमध्ये शिफ्ट केले जाईल. ऑस्ट्रेलिया सरकार हा प्रकल्प सुरु करण्याच्या तयारीत आहे.

प्रकल्पाअंतर्गत एक महिन्यापर्यंत रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल. सुरुवातीला २० बेघर लोकांना पॅन पॅसिफिक हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.

प्रकल्पाला हॉटेल्स विथ हार्ट नाव दिले गेले असून सरकार अशा बेघर लोकांना निवडणार आहे जे आतापर्यंत स्वतःला आयजोलेशनमध्ये ठेवण्यात अयशस्वी झाले आहेत. नंतर या प्रकल्पात घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला आणि मेंटल हेल्थचा सामना करणारे लोकंही सहभागी केले जाऊ शकतात. जर हा प्रक्लप यशस्वी झाला तर हॉटेलच्या १२० रूम्स वापरल्या जाऊ शकतात.

या नव्या प्रकल्पाबद्दल तेव्हा माहिती आली जेव्हा लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मागच्या आठवड्यात एका टास्क फोर्सची संघटना केली गेली होती. कम्युनिटी सर्व्हिस मिनिस्टर सिमोन मॅगर्क यांनी म्हटले की, या प्रयत्नामुळे आम्ही आरोग्य सेवांवर येणारा दबाव कमी करू शकतो.