अ‍ॅलर्जीची भीती वाटते तर करा ‘होममेड ब्लीच’, एकादाच केल्यावर स्कीन होईल ग्लो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एखाद्या फंक्शन, पार्टीमध्ये जायचे किंवा सामान्य रूटीनमध्येच स्त्रिया चेहरा सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर ब्लीच करतात. बाजारात तुम्हाला बर्‍याच प्रकारचे ब्लीच सहज उपलब्ध होईल. परंतु, काही महिलांना बाजारात मिळणारे ब्लीच सूट होत नाहीत, जर चेहरा स्वच्छ आणि सुंदर बनवायचा असेल तर सहजपणे घरी ब्लीच तयार करू शकतो. घरी ब्लीच तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे ते जाणून घ्या.

साहित्य :
१) कच्चे दूध – १ चमचा
२) बटाटा रस – २ चमचे
३) लिंबू – १ चमचा (लिंबाची साल फेकू नका)
४) तांदळाचे पीठ – १ चमचा

ब्लीच कसे करावे
१) प्रथम कापसाच्या मदतीने चेहरा आणि मान कच्च्या दुधाने स्वच्छ करा. यामुळे त्वचेतील घाण व धूळ दूर होईल.
२) नंतर बटाट्याचा रस, लिंबाचा रस, तांदळाचे पीठ याचे मिश्रण तयार करा. ५-१० मिनिटे चेहर्‍यावर मालिश करा आणि नंतर ३० मिनिटे तसेच राहू द्या.
३) आता लिंबाच्या सालाने चेहऱ्यावर मालिश करा आणि ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे आपला चेहरा बाहेरच्या ब्लीचसारखे चमकेल.

ब्लीच सूट करत आहे की नाही हे कसे ओळखावे ?
बर्‍याच वेळा काहीतरी लावले तर त्वचेचा रंग सावळा पडतो आणि मुरुमही बाहेर येऊ लागतात. म्हणजे, ती गोष्ट आपल्याला सूट होत नाही. यामुळे त्याचा वापर करणे टाळावे. जर लिंबू सूट होत नसेल तर आपण टोमॅटोचा रस घेऊ शकता.

होममेड ब्लीचचे फायदे
कच्चे दूध आपल्या त्वचेला नैसर्गिक बनविण्यात मदत करते. चेहर्‍यावरील सुरकुत्या, मुरुम, हलके डाग दूर करण्यासाठी बटाटा रस एक सोपा आणि उत्कृष्ट घरगुती उपाय आहे. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेला एक ताजे आणि चमकणारी त्वचा देईल.