पार्लरचा खर्च वाचवायचाय ? ‘या’ पद्धतीनं घरच्या घरीच तयार करा ‘प्रायमर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल आणि पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तसेच मेकअप जास्त वेळ टिकवायचा असेल तर तुम्ही घरीच प्रायमर तयार करू शकता. यात केमिकल्स नाहीत आणि बनवायला वेळही लागत नाही.

प्रायमर तयार करण्याची पद्धत –

– एका भांड्यात थोडं सन्सक्रिन घ्या

– यात काही प्रमाणात अॅलोवेरा ज्यूस किंवा तेल घ्या.

– यात फाऊंडेशन पावडर मिक्स करा.

हे तयार मिश्रण म्हणजेच तुमचा प्रायमर आहे.

प्रायमर तयार करण्यासाठी आणखी एक पद्धत – जर तुमच्या त्वचेला अ‍ॅलोवेरा सूट नसेल करत तर तुम्ही ग्लिसरीन वापरूनही प्रायमर तयार करू शकता.

– एका बाऊलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन घ्या

– यात 3 चमचे पाणी घ्या.

– यात अर्धा चमचा मॉईश्चरायजर घाला

– नीट मिश्रण तयार करा.

– हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये टाका.

प्रायमरचा वापर त्वचेवर मेकअप लावण्याआधी केला जातो. याचा वापर मेकअप चांगला टिकून ठेवण्यासाठी केला जातो. फाईन लाईन्स आणि सुरकुत्या लपवण्यासाठीही याचा वापर केला जातो. जर प्रायमर न वापरता तुम्ही मेकअप केला तर त्वचा कोरडी होते. मेकअप फाटल्यासारखा पसरल्यासारखा दिसतो.