पार्लरला न जाता घरीच मिळवा आकर्षक अन् चमकदार त्वचा ! वापरा ‘हे’ 3 घरगुती सोपे ‘फेस पॅक’

पोलीसनामा ऑनलाइन –त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी आपण अनेक महाग आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरतो. आज आपण काही घरगुती आणि फायदेशीर फेस पॅक कसे बनवायचे याची माहिती घेणार आहोत. शिवाय हे पॅक काही मिनिटातच तयार होतात आणि बनवायलाही खूप सोपे असतात.

1) ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक – या फेस पॅकमुळं त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. यातील अँटीऑक्सिडंट्समुळं त्वचा ग्लो करते. शरीरातील विषारी पदार्थही यामुळं बाहेर पडतात. हा फेस पॅक तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– एक कप ग्रीन टी घ्या. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा मध टाका.
– तयार झालेलं हे मिश्रण 20 मिनिटे असंच राहू द्या.
– यानंतर चेहऱ्यावर लावून मालिश करा.

2) हळद आणि टोमॅटोचा फेस पॅक – हा फेस पॅक रात्री झोपण्याआधी लावला तर अधिक चांगला परिणाम होतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– हळद आणि टोमॅटो एका भांड्यात घेऊन पेस्ट तयार करा.
– आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
– 15 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर असाच ठेवा
– सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून टाका.

3) ओट्स आणि लिंबाचा फेस पॅक – हा पेस पॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– ओट्स बारीक करून घ्या
– यात लिंबाचा रस टाका
– आता हे मिश्रण चेहरा आणि मानेच्या त्वचेला लावा.
– आता हा पॅक 15 ते 20 मिनिटे असाच ठेवा.
– साधारण 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं धुवून टाका.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like