त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतील ‘हे’ 6 सोपे घरगुती FacePack ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपण पार्लरला न जातानाही सुंदर चेहरा आणि चांगली त्वचा मिळवू शकतो. तुम्ही घरच्या घरीच काही फेसपॅक तयार करू शकता. यामुळं तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि याचे कोणते दुष्परिणामही होत नाहीत. आज आपण काही सोपे घरगुती फेसपॅक कसे बनवायचे आणि त्यांचे काय फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) हळद – हळदीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात. त्यामुळं त्वचेला थंडावा मिळतो. चेहऱ्यावरील डार्क सर्कलही यामुळं दूर होतात. यात असणाऱ्या नॅचरल अँटीसेप्टीकमुळं चेहरा जास्त उजळतो. मुलतानी माती जर हळदी सोबत लावली तर चेहऱ्याचा ग्लो वाढतो. हा पॅक बनवण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर हे दुधात एकत्र करून लावावं. चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावावं. सुकल्यांतर पाण्यानं स्वच्छ करा.

2) बेसन – याचा वापर तुम्ही स्क्रबप्रमाणे करू शकता. यामुळं त्वचा मऊ आणि स्वच्छ होण्यास मदत होते. त्वचेचे विविध इंफेक्शनही दूर होतात.

3) दूध – दुधातील लॅक्टीक अ‍ॅसिडचा चेहऱ्याला खूप फायदा होतो. दोन चमचा साखर आणि 1 चमचा दूध घेऊन मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर चोळा. यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. जर हे नको असेल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कापसाचा बोळा दुधात भिजवून त्यानं चेहरा पुसून काढला तरी चालेल.

4) काकडीचा फेसपॅक – यामुळं त्वचेतील ओलावा टिकून राहतो. ज्यांना कोरड्या त्वचेची समस्या आहे त्यांनी काकडीचता फेसपॅक लावावा. यामुळं चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो, त्वचेची जळजळ होत नाही, त्वचेवरील फुगवटा कमी होतो. काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धी काकडी चांगली किसून घ्या. यात 2 चमचे साखर घाला. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर या मिश्रणानं चेहऱ्यावर मालिश करा. नंतर चेहरा चांगला धुवून घ्या. आठड्यातून दोन वेळा हा पॅक वापरा. यामुळं त्वचेवरील मळ आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.

5) केळीचा फेसपॅक – एक केळ घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल आणि मध मिक्स करा. आता तयार मिश्रण नीट एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर स्वच्छा पाण्यानं चेहरा धुवून घ्या. यामुळं त्वचेतील कोरडेपणा दूर होतो.

6) टोमॅटो-मध फेसपॅक – 2 चमचे टोमटो रस घ्या. त्यात अर्धा चमचा मध टाका. हे मिश्रण नीट एकत्र करून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवून घ्या. यामुळं चेहरा उजळ दिसेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.