Immunity-boosting kadha : इम्युनिटी वाढवण्यासह फुफ्फुसांची सुद्धा काळजी घेईल ‘आले’ आणि ‘तुळशी’चा काढा, जाणून घ्या कृती

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला मजबूत करावेच लागेल. शरीराची इम्युनिटी मजबूत असेल तर कोरोनासह अनेक रोग जवळ येऊ शकणार नाहीत. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आणि फुफ्फुसांची काळजी घेणारा आलं आणि तुळशीचा काढा कसा तयार करावा याची कृती आणि फायदे जाणून घेवूयात…

आले आणि तुळशीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत, जे आपली इम्युनिटी वाढवतात तसेच अनेक रोगांवर लाभदायक सुद्धा आहे. तुळस आणि आल्याचे ड्रिंक आपल्या फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी अतिशय परिामकारक आहे. हे ड्रिंक कसे तयार करायचे ते जाणून घ्या.

साहित्य

* एक इंच सोललेले आले

* तेवढीच आख्खी हळद

* थोडे काळीमिरी दाणे

* तुळशीची चार पाने

* 1.5 कप पाणी

ड्रिंक बनवण्याची कृती :

आले, हळद, काळीमिरी आणि तुळशीची पाने पाण्यात टाकून उकळवून घ्या. किमान 10 मिनिटे उकळू द्या. 10 मिनिटानंतर गॅस बंद करा आणि ते थंड झाल्यानंतर सेवन करा. हे ड्रिंक सकाळी आणि सायंकाळी पिऊ शकता. हा काढा फुफ्फुसांची काळजी घेईल. तुळस आणि आले अ‍ॅटीबॅक्टेरियल आणि अँटी वायरल गुणांनी भरपूर आहे. याशिवाय या दोन्ही गोष्टी घशाची खवखव आणि सर्दीवर परिणामकारक आहेत. तुळस आणि काळीमिरी शरीराच्या इम्फलामेटरीला संतुलित ठेवते.