दररोज रात्री लावा ‘हे’ घरगुती नाईट क्रीम, हिर्‍यासारखा चमकेल तुमचा चेहरा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामातील थंड वारा त्वचेवर सर्वाधिक परिणाम करतो. यामुळे त्वचा कोरडी व निस्तेज होते. त्यावेळी, मुरुमांची समस्या कोरडी आणि निस्तेज त्वचा अशा समस्या देखील अधिक दिसून येतात. असे काही घरगुती नाईट क्रीम आहेत. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा कायम टिकून राहील आणि कोरडेपणा जाणवणार नाही. चेहरा देखील चमकत राहील.

साहित्य:
१)ताजे कोरफड जेल – १ चमचा
२)कोरफड जेल ट्यूब – १ चमचा(केशर चंदन असलेले)
३) ग्लिसरीन – ५ थेंब
४) बदाम तेल – ५ थेंब

_बनविण्याची पद्धत
सर्व साहित्य चांगले एकत्र करून मिश्रण तयार करा. ते चांगले एकजीव करून घ्या. नंतर ते कंटेनर किंवा बाटलीमध्ये भरून ठेवा आणि त्यास स्वच्छ ठिकाणी ठेवा. आपण ते एका महिन्यासाठी आरामात वापरू शकता कारण ते खराब होत नाही.

_कसे वापरायचे
सर्व प्रथम आपला चेहरा धुवून घ्या. जेणेकरून मेकअप, घाण आणि अतिरिक्त तेल निघून चेहरा स्वच्छ होईल. आता ही नाईट क्रीम त्वचेत जाईपर्यंत सुमारे ५_६ मिनिटे मालिश करा. आणि रात्रभर तसेच राहू द्या.

_ही क्रीम फायदेशीर का आहे?
ही क्रीम त्वचेला मॉइस्चराइज करते आणि नुकसान झालेल्या पेशींना पुनरुज्जीवित करते, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. चेहऱ्याचा रक्त प्रवाह देखील वाढतो, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

टीपः जर ही सर्व सामग्री आपल्या त्वचेला अनुकूल असेल तरच ही क्रीमचा वापर करा. जर एखादी वस्तू आपल्या त्वचेला अनुकूल नसेल तर आपण त्यास वगळू शकता.