Hair Tips : नको असलेले केस जर नैसर्गिक पध्दतीनं नाही काढले तर पुन्हा येणार नाहीत केस

पोलिसनामा ऑनलाईन – तणाव, पीसीओडी आणि उच्च टेस्टोस्टेरोनमुळे मुलींमध्ये अनावश्यक केसांची समस्या उद्भवते. जरी मुली यासाठी वैक्सिंग, अपर लिप्स यांसारखे उपचार करत असतील तरी काही दिवसात त्यांचे केस पुन्हा वाढतात. त्यामुळे काही घरच्या घरी उपाय करून आपण अनावश्यक केसांच्या समस्यापासून मुक्तता मिळवू शकता.

साहित्य:
१) तुरटी
२) गुलाबपाणी
३) कस्तुरी हळद

कसे तयार करावे?
तुरटी बारीक करून त्यात थोडे गुलाब पाणी आणि हळद घाला. जर गुलाबपाणी आपल्या त्वचेला अनुकूल नसेल तर आपण फिल्टर पाणी देखील वापरू शकता. परंतु, जर त्वचा संवेदनशील असेल तर गुलाब पाणीच लावा.

कसे वापरावे?
अपर लिप्स, वैक्सीन आणि फोरहेड केल्यानंतर हा पॅक लावा आणि कमीतकमी १० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर हळूहळू चोळून स्वच्छ करा. यानंतर कापसामध्ये गुलाबपाणी किंवा पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. नंतर चेहऱ्यावर थोडेसे गुलाबपाणी लावा जेणेकरून जळजळ, पुरळ होणार नाही.

किती वेळा वापरावे?
जेव्हा जेव्हा तुम्ही अपर लिप्स, वैक्सीन आणि फोरहेड करता तेव्हा सलग ७ दिवस हा पॅक वापरावा.

हे लक्षात ठेवा
अपर लिप्स, वैक्सीन आणि फोरहेड केल्यानंतरच हा पॅक लावावा. कारण, तेव्हा छिद्र उघडते. हा पॅक वापरण्याने स्वतः आतून केसांची वाढ कमी होईल. कारण त्यामध्ये नैसर्गिक गोष्टी वापरल्या गेल्या आहेत त्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही.