घरीच्या घरी बनवा वेदनानाशक तेल; जाणून घ्या माहिती

पोलिसनामा ऑनलाईन – बाजारात अनेक प्रकारचे तेल आहेत. अनेकदा बाजारू उपयांपेक्षा घरी केलेल्या उपायाने अधिक फरक पडतो, याची प्रचिती अनेकांना आली असेल. आता आपण या घरच्याघरी बनवता येणार्‍या तेलाविषयी माहिती घेऊया. ज्याचा उपयोग मुचकणे, सांधे निसटणे, अवघडणे, ताठरणे अशा समस्यांवर हे तेल उपयोगी आहे.

असे बनवावे वेदनाशामक तेल :
1) 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचे बारीक तुकडे करा.
2) 100 ग्राम तिळाचे तेल घ्यावे आणि त्या तेलात लसणाचे तुकडे टाका.
3) यानंतर तेलात 500 ग्राम आंबी हळद आणि 2 चमचे ओवा घाला.
4) तेल खूप उकळावे.
5) त्यानंतर तेल गार करण्यास ठेवावे. तेल गार झाल्यावर गाळून एका स्वच्छ बाटलीत भरा.