टोमॅटो पासून बनवा ‘हे’ 5 सर्वोत्कृष्ट फेसपॅक अन् त्वचा बनवा अनेक पटीनं ‘जवान’, जाणून घ्या पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – त्वचा सुंदर आणि तरूण ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते. आपल्या स्वयंपाक घरांमध्ये सहज उपलब्ध होणारा टोमॅटो आरोग्यासह त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये असलेले पौष्टिक आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म त्वचेला अनेक समस्यांपासून बचाव करण्यास मदत करतात. चला तर मग त्याचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊया …

टोमॅटोचे बारीक तुकडे करून ते चेहरा आणि मानेला हलक्या हाताने चोळा. नंतर सुमारे ३० मिनिटे असेच चालू ठेवा. नंतर ते गार पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहरा पूर्णपणे स्वच्छ होतो. त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. त्वचा गोरी होण्यास मदत होते. आपण फेसपॅक म्हणून देखील वापरू शकता. टोमॅटो पासून एकूण ५ फेस पॅक कसे बनवायचे ते आज जाणून घेऊयात …

१)टोमॅटो आणि काकडी

एका भांड्यात २ मोठे चमचे काकडीचा रस, १ चमचा मध आणि टोमॅटोचा रस मिसळा. तयार मिश्रण चेहरा आणि मानेवर १५-२० मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने ते स्वच्छ करा. हा फेसपॅक आपली काळी झालेली त्वचा निखरण्यासाठी मदत करेल. चेहरा सुंदर आणि चमकदार बनवेल.

२) टोमॅटो आणि ऑलिव्ह तेल

सर्वप्रथम मिक्सरमध्ये १ चिरलेला टोमॅटो आणि १ चमचा ऑलिव्ह तेलाचे मिश्रण तयार करून घ्या. नंतर ते हलक्या हातांनी चेहरा आणि मानेवर लावा. यानंतर ते १५-२० मिनिटापर्यंत ठेवा. नंतर हलक्या हातांनी पुन्हा मालिश करून ते आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा. या मिश्रणामुळे त्वचेला ओलावा मिळेल. डाग, झाकरे, सुरकुत्या यासारख्या समस्या दूर होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्वचा बर्‍याच काळापर्यंत तरुण दिसते.

३)टोमॅटो आणि चंदन पावडर

अर्धी वाटी किसलेले टोमॅटो, १ चमचा चंदन पावडर एका भांड्यात घेऊन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर १५ – २० मिनिटे लावावे. नंतर ते कोमट पाण्याने स्वच्छ करावे. औषधी गुणधर्मांनी तयार केलेले मिश्रण लावल्याने मुरुम, डाग, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होतात आणि नैसर्गिकरित्या चेहरा चमकतो.

४)टोमॅटो आणि दही

सर्व प्रथम मिश्रणात १ चमचा दही, लिंबाचा रस आणि १ मध्यम आकाराचा टोमॅटो मिसळा. नंतर सुमारे २ मिनिटे चेहरा आणि मानेवर तयार मिश्रण ठेवावे. पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या मिश्रणामुळे चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या दूर होतील. कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

५) टोमॅटो आणि कोरफड

एका भांड्यात २ चमचे किसलेले टोमॅटो आणि कोरफड जेल मिसळा. तयार मिश्रण चेहरा आणि मानेवर १५ मिनिटे किंवा कोरडे होईपर्यंत लावा. नंतर ते थंड पाण्याने स्वच्छ करा. या मिश्रणामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन आराम मिळेल. खाज सुटणे, डोळ्यांखालील गडद वर्तुळे काढून टाकण्यासाठी हे मिश्रण खूप फायदेशीर आहे. चांगले परिणाम मिळविण्यासाठी आठवड्यातून २ वेळा यापैकी कोणतेही मिश्रण लावू शकता.