समलैंगिकता सामान्य नसून, ती हिंदुत्वविरोधी आहे : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

समलैंगिकता अपराध मानणाऱ्या आयपीसी 377 कलमाला घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. यावरुन समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं मत भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. समलैंगिकता अनैसर्गिक असून हा आजार दूर व्हावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गरज असल्याचंही स्वामी म्हणाले आहेत.

कलम 377 नुसार समलैंगिकता हा गुन्हा ठरतो, त्यामुळे कलम 377 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावर भाष्य करताना समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. ‘समलैंगिकता दूर व्हावी, यासाठी संधोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतानं वैद्यकीय संशोधनावर मोठी गुंतवणूक करायला हवी,’ असं ते म्हणाले. समलैंगिकता सामान्य नसल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

[amazon_link asins=’B075GWHMX3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f705951e-8423-11e8-9c49-29f5c1bd2eb7′]

‘समलैंगिकता सामान्य नाही. ती हिंदुत्वविरोधी आहे. ती दूर व्हावी, यासाठी आपण वैद्यकीय संशोधन करायला हवं. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायला हवी,’ असं स्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं. आज (मंगळवार) पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होत आहे. यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.