ओम नमो च्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार…

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

ओम नमो:चिकित्सालय व ओम नमो:परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त मोफत योग शिबीर आयोजित करण्यात आले.यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व फादर्स डे साजरा करण्यात आला.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘योग’चे महत्व डॉ वैशाली लोढा यांनी सांगितले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्द याचे महत्त्व पटवून सांगितले.

डॉ.पवन लोढा यांनी वडीलधाऱ्यांचा आदर,व्यायाम व अभ्यास ह्या त्रिसूत्री बद्दल सांगितले.प्राध्यापक व  कलाकार मंगेश दळवी यांनी स्वतः मधील गुणांना ओळखून त्यांचे जतन करण्यासाठी वेळ द्यायला शिकवले.चित्रकार व शिक्षक सुरेश वरगंट्टीवार यांनी छंद जोपासायला सांगितले तर उद्योजक दिलीप पाटकर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.

धनश्री दळवी व सुनीता जाधव यांनी फादर्स डे निमित्त रोजच्या आयुष्यात त्यांचे महत्व पटवून दिले.यावेळी १० वी १२ मधील यशस्वी मुलांना ओम् नमोः चिकित्सालय यांच्यातर्फे गौरविण्यात आले.ओम लुंकड, अनिश घुले,स्वरूप खारुळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक अधिक संख्येने उपस्थित होते.