अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) आहे. ती शोरूममधून खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण आम्ही एक अशी ऑफर सांगणार आहोत ज्यामध्ये अवघ्या 21 हजार रुपयात Honda Activa घरी घेऊन जाऊ शकता.
होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
– 109.5 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन, 7.68 बीएचपीची पॉवर आणि 8.79 एनएमचा पीक टॉर्क.
– फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक.
– ट्यूबलेस टायर.
– मायलेजचा दावा 60 किलोमीटर प्रति लीटर
आता ही स्कूटर अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची ऑफर जाणून घेवूयात…
– होंडा अॅक्टिव्हावर ही ऑफर सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी-विक्री करणारी ऑनलाइन वेबसाइट BIKES24 ने दिली आहे. या साईटवर 21 हजार रुपयांच्या किंमतीत ही स्कूटर लीस्ट केली आहे.
– स्कूटरचे मॉडल 2014 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे. आता पर्यंत 29,103 किलोमीटर धावली आहे. रजिस्ट्रेशन हरियाणा एचआर-51 आरटीओचे आहे.
– काही अटींसह एक वर्षांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी कंपनी देत आहे. स्कूटर खरेदी केल्यानंतर पसंत न आल्यास सात दिवसात परत करू शकता. कोणतीही कपात न करता पैसे परत दिले जातील.
CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’