अवघ्या 21 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा Honda Activa, पसंत न आल्यास कंपनी परत देईल पूर्ण पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Honda Activa | टू-व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटला आता लोक बाईकप्रमाणेच पसंत करू लागले आहेत. यामध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हाचा (Honda Activa) वरचा क्रमांक आहे. तिची शोरूम किंमत 69,080 रुपये ते 72,325 रुपयांपर्यंत आहे. तुमचे इतके बजेट नसेल तर येथे आम्ही होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या त्या ऑफरबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये ही स्कूटर अवघ्या 21 हजार रुपयात घरी घेऊन जाऊ शकता.

होंडा अ‍ॅक्टिव्हाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

109.51 सीसीचे इंजिन, फॅन कूल्ड तंत्रज्ञानाचे एसआय इंजिन

इंजिन 7.79 पीएसची पावर आणि 8.79 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

ट्रांसमिशन ऑटोमॅटिक आहे.

कंपनीकडून मायलेजचा दावा 60 किलोमीटर प्रति लीटर.

आता स्कूटरवर (Honda Activa) देण्यात येत असलेली ऑफर जाणून घेवूयात…

सेकंड हँड गाड्यांची विक्री करणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या साईटवर ही स्कूटर लीस्ट केली आहे. जिची किंमत अवघी 21 हजार रुपये ठेवली आहे.

स्कूटरचे मॉडल 2014 चे आहे. ओनरशिप सेकंड आहे. आतापर्यंत 29,103 K.M. धावली आहे. रजिस्ट्रेशन हरियाणाचे एचआर-51 आरटीओचे आहे.

स्कूटर खरेदीवर कंपनी 1 वर्षांच्या गॅरंटीसह 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. गाडी पसंत न आल्यास ती सात दिवसात परत करता येईल. कंपनी पूर्ण पैसे परत देईल.

 

Web Title : Honda Activa | second hand honda activa in 21 thousand with 1 year warranty plan read full details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mahapour Chashak | महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट, स्पर्धेेच्या मान्यतेस वित्तीय समितीचा नकार

Diabetes control | अंड्यामुळे आणखी वाढेल डायबिटीज! ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी सेवन करा ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी