24.7 kmpl मायलेज असणाऱ्या Honda च्या ‘या’ फॅमिली कारवर मिळत आहे मोठा ‘डिस्काउंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कार निर्माता कंपनी होंडा सध्या भारतीय बाजारात होंडा अमेझ (Honda Amaze) खरेदीवर ग्राहकांना उत्तम ऑफर देत आहे. आपण यावेळी नवीन होंडा अमेझ खरेदी करण्याची योजना आखत असाल तर येथे उपलब्ध असलेल्या ऑफर्सबरोबरच इतर माहिती आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ऑफर आणि किंमत
ऑफरच्या बाबतीत बोलायचे झाले तर होंडा अमेझच्या खरेदीवर जवळपास 27,000 रुपयांपर्यंतची बचत करता येईल. होंडा अमेझ मधील पेट्रोल/डिझेलचे सर्व बीएस 6 ग्रेड्सला जर तुम्ही जुन्या किंवा सध्याच्या कारला एक्सचेंज करून खरेदी करत असाल तर 12,000 रुपये किमतीची एक्सटेंडेड वॉरंटी (चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी) मिळेल. कार एक्सचेंजवर 15,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. त्याच वेळी, आपण जुन्या किंवा सध्याच्या कारला एक्सचेंज न केल्यास, आपल्याला 12,000 रुपयांची एक्सटेंडेड वॉरंटी (चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी) मिळेल. याशिवाय तुम्हाला 3,000 रुपयांपर्यंतची रोखीची सूट मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास होंडा अमेझची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6,17,000 रुपये आहे.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन
पॉवर आणि स्पेसिफिकेशनच्या संदर्भात बघितले तर होंडा अमेझ बीएस 6 (Honda Amaze BS6) मध्ये 1199 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे जे की 6000 आरपीएम वर 90 पीएसची पॉवर आणि 4800 आरपीएम वर 110 एनएमचे टॉर्क जनरेट करते. तसेच दुसरे एक 1498 सीसीचे डिझेल इंजिन आहे जे 3600 आरपीएम वर 100 पीएसची पॉवर आणि 1750 आरपीएम वर 200 एनएमचा टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे मायलेजच्या बाबतीत कंपनीच्या अधिकृत साइटनुसार, होंडा अमेझ पेट्रोलमध्ये 18.6 किमी प्रति लीटरचे मायलेज आणि डिझेलमध्ये 24.7 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. डायमेन्शनच्या बाबतीत अमेझची लांबी 3995 मिमी, रुंदी 1695 मिमी, उंची 1501 मिमी, व्हीलबेस 2470 मिमी, बूट स्पेस 420 लिटर आणि फ्यूल टॅन्कची क्षमता 35 लिटर आहे. सस्पेंशनच्या बाबतीत, अमेझ बीएस 6 मध्ये पुढच्या बाजूला मॅकफर्शन स्ट्रट कॉइल स्प्रिंग आणि मागील बाजूस टॉर्सियन बीम कॉइल स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहे.