पुण्यातील त्या रिक्षाचालकाच्या ‘प्रमाणिक’पणाला ‘सलाम’, केली चक्क 7 लाखाची बॅग परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षात विसरून राहिलेले तब्बल सात लाखांचे सोन्याचे दागिने प्रमाणिकपणे परत दिले आहेत. आजच्या जमान्यातही प्रामाणिकपणा  शिल्लक असल्याचे दाखवून देणार्‍या या रिक्षा चालाकाचा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल-श्रीफळ देऊन पोलिसांनी सत्कार केला आहे. तुकाराम यादवराव काळे (रा. ससाणेनगर) असे रिक्षा चालकाचे नाव आहे.

बिबवेवाडी परिसरातील शोभा लुंकड (वय 55) या कॅम्प परिसरातील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. खेरदी केल्यानंतर त्या रिक्षाने परत घरी निघाल्या. पण, अप्सरा चित्रपटगृहाजवळ त्यांच्या मुलाच्या कार्यालयात जायचे होते. त्यामुळे त्या ठिकाणीच रिक्षातून उतरल्या. त्यांनी रिक्षा चालकास पैसे देऊन मुलास भेटण्यासाठी गेल्या. पण, त्यांची सात लाख रुपयांचे दागिने व खरेदी केलेल्य कपड्याच्या बॅग रिक्षातच विसरल्या. मुलाकडे गेल्यानंतर त्यांना बॅग विसल्याचे लक्षात आले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काय करावे ते सुचेना. त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांची भेट घेऊन प्रकार सांगितला.

स्वारगेट पोलिसांनी तत्काळ रिक्षा चालकाचा सीसीटीव्हीवरून शोध सुरू केला. रिक्षाच्या क्रमांकावरून त्यांना ही रिक्षा ससाणेनगर येथील असल्याचे समजले. तोपर्यंत चालकास देखील त्याच्या रिक्षामध्ये सोन्याचे दागिने व कपडे विसरल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी देखील पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी मौल्यवान ऐवज व कपडे पोलिसांकडे जमा केले. पोलिसांनी लुंकड यांना त्यांचे दागिने व कपडे सापडल्याचे सांगितले.

पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते हा ऐवज त्यांना परत करण्यात आला. तसेच, रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणा बद्दल त्याचा सत्कार केला.लुंकड यांनी देखील रिक्षा चालकाचे आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like