प्रसन्न चेहर्‍यासाठी ‘मध-दूध-साखर’ अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या हिवाळा सुरू झाला आहे. त्यात दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीसाठी सौंदर्योपचार करताना थंडीचा, थंडीतल्या कोरड्या वातावरणाचाही विचार करावा लागणार आहे. या दिवसात आपण आपल्या त्वचेला जर भरपूर पोषण पुरवू शकलो तर त्वचेवर सणासुदीसाठीचे आवश्यक तेज आणि प्रसन्नता येईल. या प्रसन्न त्वचेसाठी स्वयंपाकघरातल्या मध, दूध आणि साखर आदी( honey-milk-sugar-happy-and-glowing-face) गोष्टींची गरज आहे.

1) मध : एक चमचा मध घेऊन हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. दहा मिनिटांनी चेहरा आधी पुसून काढावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा. मध त्वचेचा पोत सुधारायला मदत करते.

2) दूध : दिवसातून दोन वेळा कापसाचा बोळा घेऊन चेहरा दुधाने पुसून काढावा किंवा एक छोटी वाटी गार दूध घेऊन ते चेहऱ्याला लावावे. ते तसेच कोरडे होऊ द्यावे. त्यानंतर ओल्या मऊ रुमालाने चेहरा हलक्या हाताने पुसावा. दुधात मीठ घालूनही ते मिश्रण चेहऱ्याला लावणे उत्तम आहे.

3) साखर : साखरेमुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते. साखरेचा उपयोग त्वचेसाठी करतान ती दह्यात किंवा सायीत घालून ती सायसाखर चेहऱ्याला लावली तर त्वचेचा पोत सुधारतो. दहा मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवावा. साखरेच्या खरबरीतपणामुळे त्वचा स्वच्छ होते आणि तजेलदार दिसण्यास मदत होते