Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन : Honey Singh | दिवसेंदिवस ‘पठाण’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून अनेक नेते आणि संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. तर अनेकांनी हा चित्रपट आपण पाहणार नाही असे सोशल मीडियावर म्हणत पोस्ट शेअर केली आहे. तर आता या गाण्याला पाठिंबा देत गायक आणि रॅपर हनी सिंगने (Honey Singh) त्याचे मत व्यक्त केले आहे. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हनी सिंग ने एका मुलाखतीत यावर स्वतःचे मत मांडले. यावेळी त्यांनी ए आर. रहमान यांचा उल्लेख करत उदाहरण देत आत्ताच्या लोकांनी कशा पद्धतीने काही ना काही कारणावरून गाणी आणि चित्रपटांवर आक्षेप नोंदवतात हे सांगितले आहे. यावेळी बोलताना हनी सिंग म्हणाला, “पूर्वीची लोकं थोडे कमी शिकलेली होती मात्र समजूतदार होती. पूर्वी खूप स्वतंत्रता होती. लोक बौद्धिकदृष्ट्या हुशार होती. ज्या गोष्टी मनोरंजनाचे आहेत ते मनोरंजन म्हणूनच ते घ्यायची काहीही मनावर घेत नव्हती”.
पुढे बोलताना हनी सिंग (Honey Singh) म्हणाला,
“आजही मला आठवतो रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ…… त्यावेळी लोकांनी हे गाणं
स्वीकारलं होतं. आणि आता मी अशा पद्धतीची गाणी बनवली तर लोकांनी मला विरोध करायला सुरुवात केली आहे.
आता परिस्थिती काहीतरी वेगळी झाली आहे. लोक खूप संवेदनशील झाले आहेत.
हे मनोरंजन आहे त्याकडे मनोरंजन दृष्टिकोन ठेवूनच बघा”.
पठाण या चित्रपटाचे दिगदर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि
जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title :- Honey Singh | honey singh expressed his views about pathaan film
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात
Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार