Video : बॉटल कॅप चॅलेंज : हनी सिंहचा ‘तो’ व्हिडीओ, ‘किक’ने नाही उघडली बॉटल तर..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने सर्वात आधी बॉटल कॅप चॅलेंजला सुरुवात केली होती. यामध्ये तुम्हाला किक मारत बाटलीचे झाकण उघडायचे असते. जेसन नंतर अनेक बॉलिवूड स्टार्सने हे चॅलेंज पूर्ण केले. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल सहीत अनेक कलाकारांनी नावे सांगता येतील. आता भारतातील प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. परंतु त्याने खूपच विनोदी पद्धतीने हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

हनी सिंगचं खडके ग्लासी हे गाणं सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोपडाच्या जबरिया जोडी या सिनेमात रिमेक होऊन पुन्हा भेटीला येणार आहे. हनी सिंग जे बॉटल कॅप चॅलेंज केलं आहे त्यात बॅकग्राऊंडला हेच गाणं सुरु असल्याचं दिसत आहे. हनी सिंगने त्याच्या इंस्टग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याची किक मात्र बाटलीच्या हाईटपर्यंत जात नाही असं दिसत आहे.

जेव्हा हनी सिंगला किक मारून झाकण काढायला जमत नाही तेव्हा तो हाताने बाटली दाबतो आणि झाकण उडून पडतं. या व्हिडीओत हनी सिंग खूपच फिट दिसत आहे. अनेकांनी त्याच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, “हेअर स्टाईल ही ठेवा फक्त वजन कमी करा.”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अनेक दिवसांच्या गॅपनंतर हनी सिंगने सोनू के टीटू की स्विटी या सिनेमातून इंडस्ट्रीत वापसी केली. दिल चोरी साड्डा हो गया या गाण्याच्या रिमेकवर त्याने काम केले होते. यानंतर हनी सिंग पुन्हा इंडस्ट्रीत धमाल करताना दिसत आहे.

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय