मेट्रोमोनियल वेबसाईटवरून त्यानं तब्बल 15 युवतींना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं, अन्…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जीवनसाथी वेबसाईटवर (jeevansathi website) तरुणींनीना लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, या भामट्याने या वेबसाईटच्या माध्यमातून आतापर्यंत 10 ते 15 महिलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

महेश उर्फ करण गुप्ता (वय 32) असे या भामट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण हा जीवनसाथी या वेबसाईटच्या jeevansathi website माध्यमातून तरुणींना गंडा घालत होता.
जीवनसाथी वेबसाईटवर jeevansathi website करणने टोपण नावाने नाव नोंदवले होते.
आपण एक बिझनेस मॅन आहोत, अशी ओळख तो दाखवायचा.
त्यानंतर चांगल्या प्रोफाईल बघून तो उच्चशिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालत असे.
ज्या महिला त्याला संपर्क करत असे त्यांना मॉल.
रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास बोलावून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा.
एवढेच नाही तर संधी साधून विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता.
त्याने आतापर्यंत 10 ते 15 महिलांवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.
करण याने काही काळ हॅकर म्हणून काम केले होते.
गेल्या चार महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
पण तो हाती लागत नव्हता.
अखेर नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

डीएनए द्वारे मृतांची ओळख पटविणार ! आयएसओ 9001- 2015 मानांकित कंपनीत 18 जणांचा मृत्यु

आळंदी : दारु पिण्याच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन मृतदेह टाकला इंद्रायणी नदीत

Wab Title : honey trap 15 girl from jeevansathi website hacker finally arrested navi mumbai