हनी ट्रॅप केसमध्ये मोठा खुलासा ! आरोपी महिलेचा पती म्हणाला – ‘माझ्या पत्नीचे आणि मंत्र्याचे संबंध’, पण..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात राजकीय क्षेत्रात आणि समाजात मोठी खळबळ उडवून देणारी हनी ट्रॅप केस समोर आलेल्या गोष्टीला आता महिना उलटला आहे. मात्र यासंदर्भात दररोज नवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच महिलांकडे चौकशी करण्यात येत असून यामधून धक्कादायक माहिती समोर येत असून यामधील एका आरोपी महिलेच्या पतीने आपल्या पत्नीचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे स्वीआकारून राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण केले आहे.

कभी गलत इस्तेमाल नहीं किया

चुकीच्या गोष्टींसाठी वापर नाही
मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या पतीने आपल्या पत्नीचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे स्वीकारले आहे. मात्र आम्ही या संबंधाचा कधीही चुकीच्या गोष्टीसाठी वापर केला नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

पांचों महिला आरोपी जेल में

पाच महिला आरोपी जेलमध्ये
या महिलेच्या पतीने पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आपल्या पत्नीचे एफआयआर नाव नाही तरीही तिला अटक केल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी आपल्या पत्नीला या प्रकरणात फसवल्याचे देखील त्याने म्हटले आहे. 18 सप्टेंबर रोजी या पाच महिलांना पोलिसांनी अटक केली असून 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्नी ने नहीं दिलवाया कोई टेंडर

शेजाऱ्यांकडे सापडले 14 लाख रुपये
बोलताना त्याने सांगितले कि, पोलिसांनी आमच्या घरात 14 लाख रुपये सापडल्याचा आरोप केला आहे, मात्र हे पैसे आमच्या घरात सापडले नसून शेजाऱ्यांच्या घरात सापडले आहेत. त्याचबरोबर महिलेचा पती आणि मुलगा यांच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस देखील जप्त करण्यात आली आहेत.

visit : Policenama.com