नेत्यांसह अनेक अधिकार्‍यांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकविणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’, 5 पोरी चांगल्याच ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात एक हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात फसवणाऱ्या इंदूरच्या दोन मुलींना आणि भोपाळच्या तीन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. मोठ्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढून या मुली त्यांच्याकडून पैसे उकळतं असतं.

इंदूरचे पोलीस अधीक्षक  मोहम्मद युसुफ कुरैशी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, या सर्व मुलींकडे सध्या चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या गँगने कुणाकुणाला आपला निशाणा बनविले आहे याचीदेखील चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. इंदूरमधील एका अधिकाऱ्याने यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून तपास सुरु केला असता, इंदुरदुन दोन मुलींना अटक करण्यात आली. त्यानंतर भोपाळमधून तीन मुलींना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच मुलींचा समावेश असून एका ड्रायव्हरचा समावेश आहे. या व्यक्तींकडून विस्तृत तपासणी करण्यास येत असून पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या गँगने अनेक राजकीय व्यक्तींना आणि मोठ्या अधिकाऱ्यांना आपली शिकार बनवली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरु असून आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

visit : Policenama.com