‘हनीट्रॅप’ सारखं ‘लफडं’, गर्भश्रीमंतांची परदेशी मुलींकडून ‘शिकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच मध्य प्रदेशातील हनी ट्रॅपचा खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील हनी ट्रॅपच्या वृत्ताने राजकीय, नोकरदार, आणि व्यवसायिक जगतामध्ये खळबळ उडाली. भोपाळनंतर आता राजधानी दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक टोळ्या कार्यरत असून या टोळ्यांनी श्रीमंत व्यापारी, बिल्डर, डॉक्टर, आर्किटेक्ट, ज्वेलर्स, वकील यांना आपले टार्गेट करून कोट्यावधी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहीनच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे तसेच अशा प्रकारे श्रीमंतांना लुटणाऱ्या पाच टोळ्यांचा खुलासा करण्यात आला आहे.

तपासामध्ये ही टोळी चालवणाऱ्याकडून श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर आणि आकर्षक परदेशी महिलांची मदत घेतली जात असल्याचे समोर आले आहे. या महिला वेगवेगळ्या पद्धतीने श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. टोळीतील महिला जमीन खरेदी विक्री, रुग्ण तर कधीकधी न्यायालयातील खटल्यांमुळे त्रस्त असल्याचा बहाणा करून श्रीमंत व्यक्तींना आपले टार्गेट बनवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढली जात होती. त्या व्यक्तीकेड किती पैसे आहेत याची माहिती काढून ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत अशा व्यक्तींना टार्गेट केले जात होते. या टोळीतील महिलांच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीमंत लोकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्याकडील डेबीट कार्डचा वापर केला जात होता. ठरलेल्या जागेवर संबंधीत श्रीमंत व्यक्ती आपले डेबीट कार्ड आणि त्याचा पासवर्ड त्या ठिकाणी लिहून ठेवत होता. त्यानंतर टोळीतील महिला डेबीट कार्डचा वापर करू पैसे काढत होती. पैसे काढल्यानंतर ते कार्ड त्या व्यक्तीला परत दिले जात होते.

1. जहांगीर गँग
या टोळीने दिल्लीत सुमारे एक डझन लोकांना टार्गेट केले असून त्यांच्याकडून 2 कोटी रुपये लुबाडले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, यामध्ये डॉक्टर, हॉटेल मालक, आर्किटेक्ट, बेकरी मालक, एसी शोरूमचे मालक, तीन बिल्डर्स आणि एक ट्रॅव्हल एजंट यांना आपले टार्गेट बनवले आहे. या कामासाठी जहांगीर गँगने पश्चिम आशियातील 25 वर्षीय महिलेला तयार केले होते. या महिलेने डॉक्टरांकडे पाठवण्यात आले. या महिलेने डॉक्टरशी जवळीक साधून एके दिवशी उपचार घेण्याच्या बहाण्याने डॉक्टरला तिच्या घरी बोलावले. यावेळी दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. महिलेने या घटनेचे चित्रीकरण करून त्याची क्लीप डॉक्टरच्या मोबाईलवर पाठवली. त्यानंतर डॉक्टरकडे 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. डॉक्टरने याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत दोघांना अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र, या टोळीचा मास्टरमाईंड जहांगीर उर्फ शेखू आणि डॉक्टरला ब्लॅकमेल करणारी महिला अद्याप फरार आहे.

2. मिट्टू गँग
एप्रिलमध्ये हनी ट्रॅपच्या या टोळीतील 7 महिलांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. ही टोळी दक्षिण दिल्ली येथील एका ज्वेलरला ब्लॅकमेल करीत होती. या टोळीने त्याच्याकडून 10 लाख रुपये उकळले होते. ही टोळी वेब पोर्टलवरून श्रीमंत लोकांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेऊन त्यांना टार्गेच करत होती.

3. परमिंदर गँग
ही टोळी 20 ते 30 वर्षे वयोगटातील मुली – महिलांना आपल्या टोळीत सहभागी करून घेत होती. या टोळीने मार्च 2019 मध्ये पाच जणांना आपल्या जाळ्यात ओढले होते. मात्र, लोकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला.

4. रोहित गँग
गुरुग्राम पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी टोळीचा मास्टर माईंड रोहित आणि त्याच्या साथीदारांना अटक करुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान या टोळीने दिल्ली आणि परिसरातील तब्बल 36 लोकांकडून दीड कोटी उकळल्याचे समोर आले. फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याची आणि टोळीतील एका महिलेशी त्याची ओळख झाली. तिने त्याला घरी बोलावून घेत त्याला शितपेयातून गुंगीचे औषध पाजले. ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्याचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत तीन लाख रुपायांची मागणी केली. पोलिसांनी सापाळा रचून महिलेला आणि गँगचा मास्टर माईंड रोहितला अटक केली.

5. मुकेश गँग
ही टोळी रोहिणी आणि दिल्लीच्या इतर भागात सक्रिय असून या टोळीमध्ये 20 लोक आहेत. ज्यामध्ये काही महिलांचा समावेश आहे. टोळीतील महिला श्रीमंत व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढत होत्या. त्या व्यक्तीला घरी किंवा ठरावी ठिकाणी बोलावून घेत त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. त्याचवेळी टोळीतील इतर लोक त्या ठिकाणी येऊन त्याचा व्हिडीओ बनवून श्रीमंत व्यक्तीकेड पैशांची मागणी करत करायचे. पैसे दिले नाही तर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्याची धमकी देत होते. या टोळीने दिल्ली आणि परिसरामध्ये 30 पेक्षा अधिक लोकांकडून अशा प्रकारे पैसे उकळल्याचे तपासात समोर आले आहे.

Visit : Policenama.com