हनी ट्रॅप : व्हिडिओ कॉल करून ‘ती’ नग्नावस्थेत जवाना समोर नाचायची

जोधपूर : वृत्तसंस्था – पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर एका जवानाला जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर या हनी ट्रॅपमध्ये तब्बल ४५ जवान अडकले असल्याचे एका चौकशीतून समोर आले. सोमवीरसिंग असे या जवानाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , जवानांकडून माहिती काढून घेण्यासाठी ही महिला जवानांना व्हिडीओ कॉल करायची एवढेच नाही तर ती व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत नृत्य करायची. हे जवान महत्त्वाच्या विभागांत व लष्करी तळांवर तैनात होते. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

या महिलेने ‘अनिका चोप्रा’ नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून भारतीय जवानांशी मैत्री वाढवली. यात हे जवान अडकत गेले. सोमवीर २०१६ मध्ये अनिकाच्या जाळ्यात अडकला. यानंतर फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमधील इतर जवानांशी मैत्री वाढवली. त्यामुळे या सर्व जवानांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान सीआयडीसह जोधपूरच्या यंत्रणाही ही चौकशी करत आहेत. आतापर्यंत नेमकी कोणती माहिती बाहेर गेली हे आता स्पष्ट होईल.