Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

पुणे : Honey Trap Racket Pune | चंदननगर (Chandannagar) येथील एका निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला (retired air force officer) हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार (Honey Trap Racket Pune) समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Vimannagar Police) तिघांना अटक केली आहे.

दत्ता ऊर्फ यादव कुर्‍हाडे ( वय ४८, रा. लवणवाडी, जुन्नर), उत्तम कान्हुजी कुर्‍हाडे (वय ४०) आणि नारायण जाधव (वय ३७, रा. कैवानमळा, जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिल सर ऊर्फ भाऊ आणि आरती चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल 4 लाखाचा मोठा फायदा, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ

याप्रकरणी चंदननगर येथील एका ५९ वर्षाच्या निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे विमाननगर (Vimannagar) येथील युनियन बँक ऑफ इंडिया (Bank of India) येथे गेले असताना आरती चौधरी असे नाव सांगणार्‍या एका तरुणीने त्यांना फोन केला. त्यांच्याकडे नोकरीविषयी चौकशी केली. त्यावेळी फिर्यादी याने आपण व्यवसाय करीत असून आपण कोणाला नोकरी देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यानंतरही तिने व्हाटसअ‍ॅपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर त्यांना १२ ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलवून घेतले. नारायणगाव येथून तिने फिर्यादी यांना एका अज्ञातस्थळी नेले. तेथे त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे तिचे नातेवाईक आले.

तेव्हा तिने फिर्यादी याने आपल्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे खोटे सांगितले. तेव्हा
त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्याला कुर्‍हाड लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हे
प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती
फिर्यादी याच्याकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे १० लाख रुपयांचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून
घेतले. या घटनेने फिर्यादी घाबरुन गेले होते. या प्रकारानंतर आरोपींनी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधून
पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी विमानतळ पोलिसांशी (Vimannagar Police) संपर्क
साधला. पैसे घेण्यासाठी आलेल्या तिघांना विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | ईडीकडून अनिल देशमुखांना पुन्हा समन्स; उपस्थित न राहिल्यास ‘लूक आऊट’ची शक्यता

Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Honey Trap Racket Pune | Shocking! Attempted robbery of a retired Air Force officer in a honey trap; Airport police arrest three

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update