‘हनी ट्रॅप’ गँगची मास्टर माइंड अडकवत होती ‘सौंदर्या’च्या जाळयात, बनवत होती ‘अश्‍लील’ व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – मध्यप्रदेशात हनीट्रॅपचा मोठा खुलासा झाला आहे. इंदौर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. इंदौर पोलिसांच्या माहितीनंतर एटीएस आणि भोपाळ पोलिसांनी धरपकड केली तर यांना धक्काच बसला. हनीट्रॅपच्या या एक्सपर्ट गँगने अनेक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात फसवले होते. इंदौरमध्ये सध्या फोनवरुन धमक्या देऊन लुबाडणूक करण्यात येत होती परंतू भोपाळच्या या गँगने अनेक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना फसवले होते.

मध्यप्रदेशच्या या बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणी इंदौरच्या एसएसपी रुचि वर्धन मिश्र यांनी सांगितले की इंदौरच्या नगर निगम भागातील एका तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर ही माहिती समोर आली की एक महिला आपल्या अन्य साथीदाराच्या मदतीने त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत आहे आणि 3 कोटी रुपये मागत आहे. हे सर्व प्रकरण पलासिया ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 405/19 अंतर्गत 419, 420, 384,506,120 बी आणि 34 च्या अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आणि प्रकरण तपासासाठी देखील घेण्यात आले.

बॅकमेलिंगचे 50 लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी हे लोक क्रेटा कार मधून भोपाळला आले होते, यात आरती द्याल आणि मोनिका यादव गँगचे सदस्य होती तर ओमप्रकाश कोरी, आरतीचा ड्रायव्हर होता, जो गाडी चालवत होता. या तिघांना क्रेटा कार सह ताब्यात घेण्यात आले, जेव्हा यांची चौकशी करण्यात आली तेव्हा स्पष्ट झाले की यात काही इतर महिला देखील सहभागी आहेत, ज्यानंतर भोपाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेताओं के पीछे लगा था हनी ट्रैप गैंग, वीडियो बनाती थी मास्टरमाइंड

यांचे नाव श्वेता जैन पति स्वप्निल जैन आणि बरखा सोनी पती अनूप सोनी. या सर्वांकडे चौकशी करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 6 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांचे नेटवर्क मोबाइल फोनच्या माध्यमातून सक्रिय होते. आरोपी महिला श्वेता जैन हिच्याकडून 14 लाख 17 हजार रुपये जप्त करण्यात आले.

एसएसपीने सांगितले की फिर्यादी हरभजन सिंह नरेंद्र नगर भागात काम करतात. त्यांना इंदौरच्या रोनक हॉटेलमध्ये बोलावण्यात आले, तेथे त्यांचा आपत्तीजनक व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

नेताओं के पीछे लगा था हनी ट्रैप गैंग, वीडियो बनाती थी मास्टरमाइंड

या गँगच्या किंग पिन श्वेता जैन यांना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रभात झा यांच्या जवळचे मानले जाते. सागरमध्ये महापौर निवडणूकीआधी एक SMS लीक झाला होता ज्यात या किंग पिन श्वेताची भूमिका होती.

सूत्रानुसार, नुकतेच मध्यप्रदेश सरकारच्या एका अतिरिक्त मुख्य सचिवाची सेक्स सीडी व्हायरल झाली होती, सीडी व्हायरल झाल्यानंतर एसीएसला फोर्स लीव्हवर पाठवण्यात आले होते. या प्रकरणी ज्या महिलेचे नाव समोर आले होते तीच या हनीट्रॅपची मुख्य आरोपी आहे.

Visit – policenama.com