Honey Trap | 53 वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले 2 लाख रुपये; व्हिडीओचा ‘मॅटर’मध्ये 2 महिलांसह 5 जण अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चारकोपरमधील ५३ वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी पाच जणांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांनी डॉक्टरला मारहाणही केल्याचे सांगितले जात आहे. एका डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करण्यात आली तसेच दोन लाख रुपये देखील (Honey Trap) उकळले.

 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ८ नोव्हेंबरला एक महिला आली होती. तिला तपासत असताना व्हिडिओ शूट करण्यात आला.

 

त्यानंतर महिलेने व्हिडिओ दाखवत डॉक्टर यांना ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली. तसेच अडीच लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकीदेखील देण्यात आली. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसोबत एक महिला त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसली.
त्यांना मारहाण करत त्यांनी दोन लाख घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी (Honey Trap) याप्रकरणी दोन महिला आणि ती पुरुषांना अटक केली आहे.
त्यांच्यावर धमकावणे, खंडणी वसूल करणे आणि डॉक्टरला मारहाण,
असे आरोप ठेवत अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title :- Honey Trap | woman caught doctor honey trap showing video take 2 lakhs charkop area of mumbai marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा